Former SEBI chairman GV Ramakrushna Demise, the Harshad Mehta scam came to light during his tenure

SEBI चे माजी चेअरमन जीव्ही रामाकृष्णा यांचे निधन, यांच्याच कार्यकाळात समोर आला होता हर्षद मेहता घोटाळा

शेअर बाजार नियामक SEBIचे माजी चेअरमन जीव्ही रामाकृष्ण यांचे शनिवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन (GV Ramakrushna Demise) झाले. शेअर बाजाराची पारदर्शकता आणि रेग्युलेशनसाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. जीव्ही रामाकृष्णा 1952च्या बॅचचे आंध्र प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी होते. 1988 मध्ये ते निवृत्त झाले होते, परंतु त्यानंतरही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करून देशसेवा केली. 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेअर बाजार नियामक SEBIचे माजी चेअरमन जीव्ही रामाकृष्ण यांचे शनिवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन (GV Ramakrushna Demise) झाले. शेअर बाजाराची पारदर्शकता आणि रेग्युलेशनसाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. जीव्ही रामाकृष्णा 1952च्या बॅचचे आंध्र प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी होते. 1988 मध्ये ते निवृत्त झाले होते, परंतु त्यानंतरही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करून देशसेवा केली.

तत्कालीन व्ही.पी. सिंग सरकारने 1990च्या मध्यामध्ये सेबीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली. 1994 पर्यंत ते या पदावर राहिले. जेव्हा त्यांना सेबीचे अध्यक्ष करण्यात आले, तोपर्यंत या संस्थेला कायदेशीर (वैधानिक संस्था) दर्जा मिळाला नव्हता. तेव्हा ती अत्यंत कमकुवत संस्था होती. त्याचवेळी 1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा झाला होता. या घोटाळ्याने फायनान्शियल मार्केट हादरून गेले होते. हा घोटाळा 1992चा सिक्युरिटीज घोटाळा म्हणूनही ओळखला जातो. शेअर बाजार हर्षद मेहतासारख्या ब्रोकरसाठी एक खेळणे बनले होते आणि बिग बुल म्हणून ओळखला जात असे. त्याने यंत्रणेतील उणिवांना आपले शस्त्र बनवले आणि रेडी फॉरवर्ड डीलच्या मदतीने हा घोटाळा केला. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतरच 30 जानेवारी 1992 रोजी सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला.

जी.व्ही. रामकृष्ण हे 1994 पर्यंत सेबीचे अध्यक्ष राहिले. त्यानंतर तत्कालीन नरसिंहराव सरकारने त्यांना नियोजन आयोगाचे सदस्य केले. 1996 मध्ये ते निर्गुंतवणूक आयोगाचे पहिले चेअरमन बनले. 1999 पर्यंत ते या पदावर राहिले. सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत पीएसयूची निर्गुंतवणूक करायची होती, म्हणून हे आयोग स्थापन करण्यात आले. त्यानंतर त्यांना बांधकाम उद्योग विकास परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले. जून 2003 पर्यंत ते या पदावर राहिले. ही त्यांच्यावर अखेरची जबाबदारी होती.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*