करिश्मा असलेले नेतृत्व नसल्यानेच कॉंग्रेसचा पराभव, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात केला दावा

कॉंग्रेसला करिश्मा असलेले नेतृत्व नव्हते. मात्र, कॉंग्रेस हे ओळखण्यात अपयशी ठरली. त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे मंत्रीमंडळ अत्यंत सुमार वकुबाच्या लोकांचे होते असेही त्यांनी म्हटले आहे. Former President Pranab Mukherjee claimed in the book that the Congress was defeated due to lack of charismatic leadership


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसला करिश्मा असलेले नेतृत्व नव्हते. मात्र, कॉंग्रेस हे ओळखण्यात अपयशी ठरली. त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे मंत्रीमंडळ अत्यंत सुमार वकुबाच्या लोकांचे होते असेही त्यांनी म्हटले आहे.मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचे दिल्लीमध्ये प्रकाशन झाले. या पुस्तकात कॉंग्रेसच्या पराभवाची कारणमिमांसा करताना मुखर्जी यांनी म्हटले आहे की, मला वाटते कॉंग्रेसमधील करिश्मा असलेले नेतृत्व हळूहळू संपत गेले. परंतु, पक्षाच्या ते लक्षात आलेच नाही. पंडीत नेहरू यांच्यासारख्या उत्तुंग नेत्याने भारताला मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता कॉंग्रेसकडे क्षमता असलेला नेताच राहिला नाही. कॉंग्रेसचे सरकार अत्यंत सुमार वकुब असलेल्या नेत्यांचे बनले होते. त्यामुळेच कॉंग्रेसचा पराभव झाला.

Former President Pranab Mukherjee claimed in the book that the Congress was defeated due to lack of charismatic leadership

२०१४ मध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना दर अर्ध्या तासाने कल मला कळवावा असे मी सांगितले होते. देशात स्पष्ट आणि निर्णायक जनादेश मिळाल्याचे पाहून मला आनंद झाला, असेही मुखर्जी यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या याच्यावर विश्वासच बसत नव्हता, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे आपले संबंध अत्यंत सौहार्दाचे होते. धोरणात्मक निर्णयांवर ते अनेकदा माझ्याशी चर्चा करत असत. त्यांना सल्ला देण्यास मीही कधी टाळाटाळ केली नाही. मोदींनी परराष्ट्र संबंधांतील कळीच्या गोष्टी खूपच लवकर समजून घेतल्या, असेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*