हर्षवर्धन जाधव म्हणतात, अ ब्युटीफुल लाईफ ! इशा झा यांची जोरदार चर्चा

  • हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इशा झा यांनीही संगनमताने शिवीगाळ करत हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदार अमन अजय चड्डा यांनी केला होता.त्यावेळी इशा झा चर्चेत आल्या होत्या .

विशेष प्रतिनिधी 

औरंगाबाद : माझ्या जोडीदार आता इशा आहेत, असं वक्तव्य करत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याची कूपी उलगडून दाखवली आहे. आपल्या पहिल्या पत्नीला आता संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरता येणार नाही, असं सांगत हर्षवर्धन जाधवांनी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यातच मैत्रीण इशा झा  यांच्यासोबत ‘अ ब्युटीफुल लाईफ !’ असं लिहिलेला फोटो शेअर करुन हर्षवर्धन जाधवांनी सर्वांना चकित केलं आहे . Former MLA Harshavardhan Jadhav Shares Photo with Friend Isha Jha captions Beautiful Lifeहर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्री आणि माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या आशीर्वादाने ईशा झा यांनी एका मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली होती. ईशा झा यांची ही एकप्रकारे राजकीय एन्ट्री मानली गेली. ईशा झा यांचे कौतुक करताना तेजस्विनी जाधवांनी त्यांना ईश्वराचा अवतार असे संबोधले होते. तसेच रायभान जाधव, आपल्याला, पुत्र हर्षवर्धन आणि नातू आदित्य यांना जसे कन्नडच्या जनतेने प्रेम दिले, तसेच प्रेम ईशालाही द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. राजकारणासोबतच ईशा झा या जाधव कुटुंबाचा भाग झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

कोण आहेत इशा झा? 

इशा झा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या साथीने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना बालपणापासूनच समाज कल्याणाविषयी मनात तळमळ होती. मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबात इशा झा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मेकॅनिक होते. शिक्षण, आरोग्य अशा विषयात इशा झा यांनी काम केलं आहे. इशा झा यांना हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी आणि मैत्रीण म्हणून पाहिले जात होते. मात्र हर्षवर्धन जाधवांनी त्यांचा उल्लेख आपला जोडीदार असा केला आहे .

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड मतदारसंघात आयोजित सभेत आपली आगामी रणनीती जाहीर केली. या सभेत इशा झा यांनी भाषण केले होते . जाधवांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांचे आशीर्वाद घेत इशा झा यांनी भाषणाला सुरुवात केली तेंव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या .

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*