Former IAS shah faesal regrets opposing Article 370

कलम 370 विरोध केल्याचा माजी IAS शाह फैसल यांना पश्चात्ताप, म्हणाले – सरकारबद्दल असे बोलायला नको होते

जम्मू-काश्मीरचे माजी सनदी अधिकारी शाह फैसल हेदेखील अमेरिकन पॉप गायिका रिहानाच्या विरोधात उतरले आहेत. रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटवर त्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 2010 मध्ये भारताच्या नागरी सेवेत अव्वल क्रमांकावर असलेल्या शाह फैसल यांनी या प्रकरणात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर भाष्य केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, ‘हो, घरातली बाब घराच्या आतच चांगली आहे.’ Former IAS shah faesal regrets opposing Article 370


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी सनदी अधिकारी शाह फैसल हेदेखील अमेरिकन पॉप गायिका रिहानाच्या विरोधात उतरले आहेत. रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटवर त्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 2010 मध्ये भारताच्या नागरी सेवेत अव्वल क्रमांकावर असलेल्या शाह फैसल यांनी या प्रकरणात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर भाष्य केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, ‘हो, घरातली बाब घराच्या आतच चांगली आहे.’

त्यानंतर शाह फैसल यांना न्यूज 18च्या एका पत्रकाराने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीवरून प्रश्न केला की, कलम 370 हटवल्यावर भारत सरकारवर टीका करणे तुमची चूक होती हे मानता का? यावर दिलगीर आहात का? तर या प्रश्नाचे उत्तर देताना शाह फैसल यांनी ट्विटरवर लिहिले की, “हो, जगापुढे भारताच्या अंतर्गत बाबींविषयी बोलताना शब्दांकडे अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.”दरम्यान, 14 ऑगस्ट 2019 रोजी शाह फैसलने बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यात ते म्हणाले होते की, ‘मला वाटते की हे आपल्या सर्वांसाठी खूप घाईचे आहे, मला मूर्ख बनायचे नाही. भारत काश्मिरींच्या या पिढीचा विश्वासघात करणार नाही, असे वाटत होते.

Former IAS shah faesal regrets opposing Article 370

परंतु, आता शाह फैसल यांनी आपल्या भूमिकेपासून पूर्णपणे यू-टर्न घेत भारत सरकारची पाठराखण करण्याचा विचार बोलून दाखवला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*