इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पानंतर सलग दहा दिवस शेअर बाजारात तेजी, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केले समाधान

पूर्वी अर्थसंकल्प सादर झाल्यावर एखादा तास शेअर बाजारात तेजी आली तरी ते चांगले मानले जायचे. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर सलग दहा दिवस शेअर बाजारात तेजी सुरू आहे. अर्थसंकल्पातील सकारात्मकतेची ही पावती असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे. For the first time in history, the stock market has risen for ten days in a row after the budget, Finance Minister Nirmala Sitharaman said.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पूर्वी अर्थसंकल्प सादर झाल्यावर एखादा तास शेअर बाजारात तेजी आली तरी ते चांगले मानले जायचे. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर सलग दहा दिवस शेअर बाजारात तेजी सुरू आहे.

अर्थसंकल्पातील सकारात्मकतेची ही पावती असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पाचे शेअर बाजाराने केलेल्या स्वागताबाबत समाधान व्यक्त करताना सितारामन म्हणाल्या, शेअर बाजाराने अर्थसंकल्पाला अत्यंत सकारात्मक रितीने घेतले आहे. गेल्या आठवड्याभरात इक्विटीमध्ये ११ टक्के वाढ झाली आहे. अर्थसंकल्प दहा दिवसांपूर्वी जाहीर झाला. तेव्हापासून ही तेजी सुरू आहे. त्यामुळे शेअर बाजाराला सकारात्मक दिशा मिळालाी आहे. इतिहासात प्रथमच हे घडले आहे.सितारामन म्हणाल्या की, अर्थसंकल्पात खासगी क्षेत्राच्या भागिदारीसाठी मार्ग दाखविला आहे. त्याचबरोबर उद्योजकतेला स्थान देण्यात आले आहे. खर्च कशा पद्धतीने होईल याची रुपरेषाही स्पष्ट केली आहे. त्याप्रमाणे कोणत्या क्षेत्रांपासून सरकार दूर राहणार आहे याबाबतही स्पष्टता आहे. त्यामुळेच बाजाराने त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. पूर्वी अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराने सकारात्मकता दाखविली आणि काही तासांसाठी तेजी आली तरी एक चांगला संदेश मानला जायचा. एक दिवसासाठी बाजारात तेजी राहिली तर त्याला चांगले म्हटले जायचे. इतिहासात प्रथमच सलग दहा दिवस तेजी राहिली आहे.

सरकारने करदात्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत. करवसुलीत शिस्त आणल्याने करदात्यांचे जाळे व्यापक झाले आहे. त्यामुळे करदात्यांवर कोणत्याही अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही. सरकार करदात्यांवर विश्वास ठेवते. करदात्यांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही हे पटवून देण्यात सरकार यशस्वी झाले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावर सर्वांनीच समाधान व्यक्त केले असल्याचे सितारामन यांनी सांगितले.

जुन्या कर प्रकरणांची चौकशी करण्याचा अवधी सहा वर्षांवरून तीन वर्षे करण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे सरकारला प्रामाणिक आणि नियमित करदात्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. यामुळेच करदाते चांगला प्रतिसाद देत आहेत.

For the first time in history, the stock market has risen for ten days in a row after the budget, Finance Minister Nirmala Sitharaman said.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*