कलम ३७० हटविल्याचा आनंद, लडाखी जनतेने भाजपाला दिला मोठा विजय


  • लडाखमधील जनतेने ३७० कलम हटविण्याचा आनंद लडाखी जनतेने व्यक्त केला आहे. हे कलम हटविल्यानंतर प्रथमच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे.

वृत्तसंस्था

लडाख : लडाखमधील जनतेने ३७० कलम हटविण्याचा आनंद मतपेटीद्वारे व्यक्त केला आहे. हे कलम हटविल्यानंतर प्रथमच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आले होते. याबद्दल लडाखमधील जनतेने आनंद व्यक्त केला होता. काश्मीरच्या जोखडाखाली कायम राहावे लागलेल्या लडाखी जनतेने राज्याचे त्रिभाजन झाल्यावर मोकळा श्वास घेतला होता. kashmir 370 act

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आले. त्याचबरोबर जम्मू, काश्मीर आणि लडाख असे त्रिभाजन करत केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिली. केंद्रशासित प्रदेश लडाखच्या स्थापनेनंतर प्रथमच येथे मतदान झाले. यापूर्वी अनेक पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली होती, त्यामुळे एका शिष्टमंडळाने दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतरच निवडणूक घेण्यात आली.

भारतीय जनता पक्षाने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 26 जागांवर झालेल्या स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल निवडणुकीत भाजपने 15 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने 9 जागा जिंकल्या आहेत. अन्य दोन जागा अपक्षांच्या खात्यात गेल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसने सर्व 26 जागा लढवल्या. आम आदमी पक्षाने 19 जागांवर उमेदवार उभे केले होते. एकूण 23 अपक्ष उमेदवार होते. स्वायत्त हिल काउंसिल निवडणुकीत पहिल्यांदा 23 ऑक्टोबरला मतदान हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने झाली. एकूण 54 हजाराहून अधिक लोकांनी मतदान केले होते.

kashmir 370 act

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल निवडणुकीत भाजपाच्या विजयाबद्दल येथील कार्यकर्ते आणि जनतेचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था