मूर्खांनो तुम्ही बसा आंदोलन करत; कंगनाचे शेतकरी आंदोलनावर ट्विट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली- पंजाब- हरियाना सीमेवर आंदोलनाला शेतकरी बसले नसून दहशतवादी बसले आहेत, अशी टीका अभिनेत्री कंगना राणावतने करून आंदोलनावर आगपाखड केली आहे. दुसरीकडे पॉप गायिका रैहेंना हिने पंजाब – हरियाना सीमेवर इंटरनेट सेवा बंद केल्याचा निषेध करून आंदोलनाला पाठींबा दिला. Fools, you sit and protest; Indian Actress Kangana tweeted about the farmers’ movementअभिनेत्री कंगना म्हणाली, आंदोलन करणारे दहशतवादी आहेत. ते देशाला फोडण्यासाठी एकत्र आले आहेत. देशाचे विभाजन झाल्यावर त्यावर राज्य करण्यासाठी चीनला आमंत्रण देण्याचे मनसुबे रचले जात आहेत, हे त्यांना कळत नाही. मूर्खांनो तुम्ही बसा आंदोलन करत, आम्ही विकाऊ नसून आमचा देश वाचविण्यास समर्थ आहोत, असे तिने ट्विट मध्ये म्हंटले आहे.

Fools, you sit and protest; Indian Actress Kangana tweeted about the farmers’ movement

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*