संसदेच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ महागले ; खासदारांना जिभेवर ठेवावा लागणार ताबा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेच्या कॅन्टीनमधील अन्नपदार्थांचे दर वाढले आहेत. अन्नपदार्थावरील अनुदान बंद केले आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.  लोकसभा सचिवालयाने नवीन मेन्यू कार्ड जाहीर केली. त्यात 3 ते 700 रुपयांपर्यंतच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. Food in Parliament canteen became more expensive MPs on the tongue

ही दरवाढ 29 जानेवारीपासून लागू झाली आहे. यादीनुसार स्वस्त भाजीची किंमत 3 रुपये आहे. तसेच नॉनव्हेज- बुफे लंच 700 रुपये तर व्हेज-बुफे लंचची किंमत 500 रुपये असेलजुन्या मेन्यू कार्डमध्ये एका चपातीची किंमत 2 रुपये , होती. ती आता 3 रुपये झाली. तंदुरी रोटी 5 रुपये आहे. चिकन बिर्याणीची किंमत 100 रुपये झाली आहे. 6 रुपयाचा बटाटा वडा आता 10 रुपयांना तर डोसा 30 ते 50 रुपये झाला आहे.

संसदेच्या कॅन्टीनमधील अन्नावर दिले जाणारे अनुदान बंद केले. या मुळे कोट्यवधी रुपयांची बचत होईल. अन्नपदार्थांच्या किंमती वाढतील. पण, किंमती बाजारभावापेक्षा कमी असतील.

– ओम बिर्ला, अध्यक्ष , लोकसभा

Food in Parliament canteen became more expensive MPs on the tongue

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती