जरूर वाचा ‘आत्मनिर्भर भारता’वर पंतप्रधानांनी भरभरून लिहिलेला हा लेख…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केल्यापासून देशातील उद्योजकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. आत्मनिर्भर भारतावरील आपले मौलिक विचार, उद्दिष्ट पंतप्रधानांनी आपल्या लिंक्डइनवरील लेखात व्यक्त केले आहेत. पंतप्रधानांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद येथे देत आहोत….  Focus on quality products and winning hearts Says PM Narendra Modi In His Linkdin Article On Atmanirbhar Bharat


 • काही दिवसांपूर्वी मी मेट्रोलॉजीच्या राष्ट्रीय संमेलनाला संबोधित करीत होतो.
 • हा एक महत्त्वाचा विषय आहे, जरी याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत नाही.
 • माझ्या संबोधनादरम्यान, मी ज्या विषयांना स्पर्श केला त्यातील एक म्हणजे मेट्रोलॉजी किंवा मोजमापाचा अभ्यास कशा प्रकारे आपल्या उद्यमींना आत्मनिर्भर भारत (स्वावलंबी भारत) आणि आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावू शकतो.
 • भारत कौशल्य आणि प्रतिभेचे ऊर्जाकेंद्र आहे.
 • आपल्या स्टार्ट-अप उद्योगांचे यश हे आपल्या तरुणांचा अभिनव उत्साह दर्शवणारे आहे.
 • नवीन उत्पादने आणि सेवा वेगाने तयार केल्या जात आहेत.
 • स्थानिक आणि जागतिक स्तरावरील मोठ्या बाजारपेठा त्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

आत्मनिर्भर भारताचे उपाय परिणामकारक; शेअरबाजारात परकीय गुंतवणूकीचा तुफान ओघ; डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ६८,५५८ कोटींची परकीय गुंतवणूक


 • जग आज परवडणाऱ्या, टिकाऊ आणि वापरण्यायोग्य उत्पादनांच्या मागे लागले आहे.
 • आत्मनिर्भर भारत प्रमाण आणि मानके या दोन तत्त्वांवर अवलंबून आहे.
 • आम्हाला अजून खूप काही करायचे आहे. त्याच वेळी, आम्हाला उत्तम दर्जाची उत्पादनेही बनवायची आहेत.
 • भारताला केवळ आपल्या उत्पादनांनी जागतिक बाजारपेठ भरून टाकण्याची इच्छा नाही.
 • भारतीय उत्पादनांनी जगभरातील लोकांची मने जिंकली पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे.
 • जेव्हा आपण ‘मेक इन इंडिया’ करतो, तेव्हा आपण केवळ जागतिक मागणी पूर्ण करण्याचेच नव्हे तर जागतिक मान्यतादेखील मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
 • आपण तयार केलेल्या कोणत्याही उत्पादनात किंवा सेवेमध्ये ‘झीरो इफेक्ट, झीरो डिफेक्ट’ (शून्य प्रभाव, शून्य दोष) बद्दल विचार करण्याची मी आपणा सर्वांना विनंती करतो.
 • प्रमुख उद्योजक, व्यवसायांतील प्रतिनिधी, स्टार्ट-अप सेक्टरमधील तरुण आणि व्यावसायिक यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान मला ते याविषयी आधीपासूनच मोठ्या प्रमाणात जागरूक असल्याचे दिसून आले आहे.
 • हे विश्व आज आपली बाजारपेठ आहे.
 • भारतातील लोकांमध्ये क्षमता आहे.
 • एक राष्ट्र म्हणून अवघ्या जगाला विश्वास आहे, भारत हे विश्वासार्ह राष्ट्र आहे.
 • आपल्या लोकांची क्षमता आणि देशाच्या विश्वासार्हतेसह उच्च गुणवत्तेची भारतीय उत्पादने दूरदूरपर्यंत जातील. जागतिक समृद्धीसाठी एक शक्ती म्हणून कार्यरत ‘आत्मनिर्भर भारता’च्या धोरणाला हेच खरे वंदन ठरेल.

Focus on quality products and winning hearts Says PM Narendra Modi In His Linkdin Article On Atmanirbhar Bharat

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*