वृत्तसंस्था
बेंगळुरू : भारताच्या संरक्षण इतिहासातला सर्वात मोठा एअर शो… ; ५५ देश, ८० परकीय कंपन्या, ५४० एरो शो प्रदर्शकांचा सहभाग आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली… संरक्षण दले, संरक्षण सामग्रीच्या अद्ययावतीकरणावर आत्मनिर्भर भारताची १३० अब्ज डॉलर खर्चाची योजना आहे. याची अंमलबजावणी येत्या ७-८ वर्षांमध्ये होईल. परकीय गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे… आणि भारतीय कंपन्यांसाठी उत्पादनाची आणि निर्यातीची नवी उंची गाठण्याची सुवर्णसंधी.focus of our policy under ‘Atmanirbhar Bharat Abhiyan’.We plan to spend 130 Billion Dollar on military modernization in next 7-8 yrs:Defence Minister
आंतरराष्ट्रीय एरो शोचे उद्घाटनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअली शुभेच्छा दिल्या. तर बीजभाषण राजनाथ सिंग यांचे झाले. १२ देशांचे संरक्षणमंत्री आणि अन्य देशांचे संरक्षण दल प्रमुख, राजदूत एरो शोच्या उद्घाटनाला उपस्थित होते. एवढ्या मोठ्या संख्येने बाहेरच्या देशांच्या सहभाग भारताच्या संरक्षण क्षमतेवरचा विश्वासच व्यक्त करतो, असे राजनाथ सिंग यांनी सांगितले.
We've taken steps to strengthen our security apparatus. Domestic manufacturing of bigger &complex defence platforms has now become focus of our policy under 'Atmanirbhar Bharat Abhiyan'.We plan to spend 130 Billion Dollar on military modernization in next 7-8 yrs:Defence Minister
— ANI (@ANI) February 3, 2021
आत्मनिर्भर भारत योजनेत स्थानिक पातळीवर उत्पादन अर्थात मेक इन इंडियाला प्राधान्य, मोठे प्रकल्प उभारणी आणि संरक्षण साहित्य उत्पादनात संपूर्ण स्वदेशीकरण हा आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण धोरणाचा केंद्रबिंदू राहील. यातूनच भारतीय संरक्षण दलांचे आणि संरक्षण सामग्रीचे अद्ययावतीकरण करण्यात येईल. याची नियोजित गुंतवणूक आणि खर्च १३० अब्ज डॉलर्स असल्याची घोषणा राजनाथ सिंग यांनी केली.
केंद्र सरकारने या आधीच संरक्षण क्षेत्रात ७४ टक्के थेट परकीय गुंतवणूकीला मूभा दिली आहे. १०० टक्के परकीय गुंतवणूकीला सरकारी परवानगीने मूभा देण्यात येणार आहे. एरो शोमध्ये सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ८० कंपन्या भारतात संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे मार्ग शोधण्याच्या हेतूनेच सहभागी झाल्या आहेत.
Karnataka: Defence Minister Rajnath Singh at Aero India show in Bengaluru; the event to be held from today to February 5. pic.twitter.com/jZHDDn42aV
— ANI (@ANI) February 3, 2021
या भव्य कार्यक्रमातच संरक्षण मंत्रालयाची ८९ तेजस विमानांच्या उत्पादनाची ४८००० कोटींची ऑर्डरचे कॉन्ट्रॅक्ट हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला प्रदान करण्यात आले. या एरो शोमधून कंपनीला अन्य देशांचीही कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची मोठी आशा आहे.