विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीवरील करमुक्त व्याजासाठीची मर्यादा अडीच लाख रुपयांवरून पाच लाख करण्यात आली आहे. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. करमुक्त व्याजासाठीची मर्यादा वाढविण्याच्या निर्णयामुळे भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. FM Nirmala Sitaraman takes bold decision
सीतारामन म्हणाल्या, उद्योगानुकूलता वाढविण्यासाठी आणि नियमांच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पी भाषणात जाहीर केलेल्या काही प्रस्तावामध्ये या विधेयकात दुरुस्ती करण्यात आली आहे. अर्थसंकल्प तयार होत असताना आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी प्राप्तिकर वाढविला जाऊ नये, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. तर प्राप्तिकरात वाढ होणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीबद्दल सीतारामन यांनी सांगितले, की यासंदर्भात जीएसटी परिषदेमध्ये राज्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्राची तयारी आहे. इंधनावर केंद्राचेच नव्हे तर, राज्यांचेही कर आहेत. सभागृहातील मागणीच्या पार्श्वकभूमीवर राज्यांची याची दखल घेऊन जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत हा विषय आणल्यास आल्यास आनंदच वाटेल अशी पुस्ती निर्मला सीतारामन यांनी जोडली. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक कर असल्याकडेही निर्मला सीतारामन यांनी लक्ष वेधले.