फ्लिपकार्टने दिला मराठीचा पर्याय; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; प्रादेशिक सेवांच्या विस्तारावर फ्लिपकार्टचा भर


मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसेतील संघर्ष ताजा असताना, आता ई कॉमर्स आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. अमेझॉनने ताठर भूमिका घेतली तर फ्लिपकार्टने सामंजस्य दाखविले. Flipkart offers Marathi option; Kept his word to Raj Thackeray; Flipkart’s emphasis on expanding regional services


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसेतील संघर्ष ताजा असताना, आता ई कॉमर्स आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. अमेझॉनने ताठर भूमिका घेतली तर फ्लिपकार्टने सामंजस्य दाखविले.

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणले नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर फ्लिपकार्टने मराठीत अ‍ॅप आणण्याचे आश्वासन दिले होते. सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार फ्लिपकार्टने आता ग्राहकांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला आहे.फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय बाजारपेठेने मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची बोली भाषा आहे. फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे.

या क्षेत्रातील घडामोडींनुसार, भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या २०२१ पर्यंत ७५ टक्के असेल आणि द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधील फ्लिपकार्ट वापरकर्त्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक असल्याने प्रादेशिक सेवांचा विस्तार वाढवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Flipkart offers Marathi option; Kept his word to Raj Thackeray; Flipkart’s emphasis on expanding regional services

फ्लिपकार्टचे चीफ प्रोडक्ट अॅण्ड टेक्नॉलॉजी ऑफिसर जयेंद्रन वेणुगोपाल म्हणाले, “भारतातील ग्राहकांसाठी ई-कामॅर्स अधिक अधिक समीप आणणे व त्यात नाविन्यता आणणे या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षांत आमचा प्रादेशिक भाषांचा व्याप लक्षणीय प्रमाणात वाढवला आहे. आमच्या व्यासपीठावरील सहा प्रादेशिक भाषांमध्ये मराठीचा समावेश करणे म्हणजे ई-कामॅर्स अधिक सर्वसमावेशक करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. फ्लिपकार्टवर प्रादेशिक सेवांचा विस्तार करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग असून त्यामुळे देशभरातील लाखो ग्राहकांसाठी ई-कामॅर्स अधिक सहज उपलब्ध आणि सोयीस्कर होऊन भारतात ई-कॉमॅर्सचे लोकशाहीकरण करण्यात कळीची भूमिका बजावेल.”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती