तांडव वादानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन मार्गदर्शक सूचना निश्चित करणार आय. बी. मंत्रालय


  • प्रकाश जावडेकर यांनी आज ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. आय अँड बी मंत्रालय लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करेल. fix new guidelines for OTT platform after Tandav controvers prakash javadekar
  • ओटीटी फ्लॅटफॉर्मला चित्रपट, कार्यक्रम, डिजिटल प्रसारमाध्यमं आदींसाठी प्रेस काऊन्सील, केबल टेलीविजन, सेन्सर बोर्ड कायदा लागू होत नाही. त्यामुळे याच्या संचालनासाठी लवकरच एक नवी व्यवस्था सुरु केली जाणार आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज माध्यमांना संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, मंत्रालय लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेल कारण त्यांना स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या काही वेब सीरिजविरोधात बर्याच तक्रारी येत आहेत.

जावडेकर यांनी म्हटले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या वेब सीरिजबाबात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. ओटीटी फ्लॅटफॉर्मला चित्रपट, कार्यक्रम, डिजिटल प्रसारमाध्यमं आदींसाठी प्रेस काऊन्सील, केबल टेलीविजन, सेन्सर बोर्ड कायदा लागू होत नाही. त्यामुळे याच्या संचालनासाठी लवकरच एक नवी व्यवस्था सुरु केली जाणार आहे.तांडव या वेबसीरिजबाबत नुकताच देशभरात वाद निर्माण झाला होता. या वेब सीरिज विरुद्ध देशभर तक्रारी आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सीरिजच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही म्हटले होते की, तांडव या वेबसीरिजबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. केंद्र सरकारने ओटीटी वर वेबसीरिज किंवा चित्रपट रिलीज होतात त्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी प्रत्येक स्तरावर करण्यात आली होती. जेणेकरुन अशा घटना पुन्हा होणार नाहीत.

fix new guidelines for OTT platform after Tandav controvers prakash javadekar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती