राष्ट्रवादी काँग्रेसच्या देणग्यांमध्ये पाचपट वाढ, रक्कम 60 कोटी

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या देणग्यात 2018-2019 पेक्षा पाचपट वाढ झाली. देणगीची रक्कम 12 कोटींवरून 60 कोटीपर्यंत गेल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. Five times increase in NCP donations, amounting to Rs 60 crore


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या देणग्यात 2018-2019 पेक्षा पाचपट वाढ झाली. देणगीची रक्कम 12 कोटींवरून 60 कोटीपर्यंत गेल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे बहुजन समाज पार्टीला देणगी मिळाली नसून केवळ 20 हजार रुपये पक्षाकडे आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसला 2018-2019 मध्ये 12 कोटींच्या देणग्या मिळाल्या होत्या. 2019- 2020 मध्ये ही रक्कम 59.9 कोटी झाली आहे. प्रमुख देणगीदारांची नावेही पुढे आली आहेत.

Five times increase in NCP donations, amounting to Rs 60 crore

त्यामध्ये बी. जी. शिर्के कॉन्स्ट्रकशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडकडून 25 कोटी, पंचशील कॉर्पोरेट पार्क प्रायव्हेट पार्क लिमिटेडकडून 7.5 कोटी, कोरोनाची लस निर्माण करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीकडून 3 कोटी, फिनॉलेक्स कंपनीकडून सुमारे 1.3 कोटी रुपये तर हार्मोनि इलेकट्रोल ट्रस्टकडून 1.5 कोटी रुपयांची देणगी पक्षाला मिळाली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*