वृत्तसंस्था
श्रीनगर : भारत पाकिस्तान सीमांवर गेल्या वर्षी पाकिस्तानने 5 हजार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे.भारत पाक सीमेवर अनेकदा दोन्ही सैन्यामध्ये चकमकी उडत असतात.Five thousand times from Pakistan Arms violation
पण, या चकमकींना पाकिस्तानच जबाबदार असल्याचे अनेकदाउघड झाले आहे. सीमेवरून दहशतवादी घुसविण्यासाठी हा गोळीबार केला जात आहे.जागतिक दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानने जम्मू काश्मीर बळकावण्यासाठी 1947 पासून प्रयत्न केले.
राजस्थानचा जवान हुतात्मा ; जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात वीरमरण
थेट लढाईत अनेकदा पराभव झाल्यावर दहशतवाद जोपासला. कधी जम्मू काश्मीरचे युवक तर कधी खलिस्तानवादी चळवळीला प्रोत्साहन देणे, युवकांची दिशाभूल करून त्यांना भारताविरोधात लढा देण्याचे षडयंत्र अनेकदा रचले आहे.