सरकारी कर्मचाऱ्यांची पाची बोटे तुपात; विविध योजनांमुळे खिशात पैसे खुळखुळणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना काळात सरकारी कर्मचार्‍यांनी जबाबदारीसह कर्तव्य पार पाडले आहे. त्यामुळे त्यांचे पगार वाढवण्याचा विचार सुरु आहे. Five fingers of government employees
सरकारी कर्मचार्‍यांना आता लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (एलटीसी) कॅशवर इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली होती. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या खिशात आणखी पैसा येईल. तो बाजारात खर्च करतील. ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.एलटीसीची घोषणा मागच्या वर्षी 12 ऑक्टोबरला केली होती. केंद्रीय कर्मचार्‍यांसह खासगी आणि अन्य राज्य कर्मचार्‍यांना योजनेत सहभागी केले होते. जे कर्मचारी कोरोनामुळे एलटीसीचा लाभ घेऊ शकले नाहीत.त्यांना रोख व्हाऊचरचा लाभ दिला जाईल.

डीएबाबत घेणार निर्णय

कोरोना महामारीदरम्यान सरकारने कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ रोखली होती. परंतु, सरकार डीएबाबत पुन्हा महत्वाचा निर्णय घेऊ शकते. अंदाजे 4 टक्के डीए वाढवला जाईल. सोबतच जुना डीए वेतनात एरियर म्हणून दिला जाईल. म्हणजेच सरकारी कर्मचार्‍यांना जास्त पैसे मिळणार आहेत.

Five fingers of government employees

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था