मशिदीसाठी दिलेली पाच एकर जमीन आपली असल्याचा दोन बहिणींचा दावा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : धान्नीपुर गावात मशिद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेली 5 एकर जमीन आमची असल्याचा दावा दिल्लीतील दोन बहिणींनी केला आहे. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. Five acres of land allotted for a mosque Two sisters claim

अयोध्यतील रामन्मभूमी- बाबरी मशिद वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने धान्नीपुर गावात मशिदीसाठी 5 एकर जागा दिली होती. परंतु, राणी कपूर उर्फ राणी बाळूजा आणि रामराणी पंजाबी यांनी ही जागा आपली असल्याचा दावा केला आहे.त्यांचे वडील ग्यानचंद पंजाबी फळणीवेळी 1947 मध्ये भारतात आले. धान्नीपुर गावात त्यांना 28 एकर जमीन सरकारकडून देण्यात आली होती. त्या जमिनीवर त्यांचे नाव होते. नंतर ते हटविले गेले होते. त्याविरोधात त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर त्यांचे नाव पुन्हा जमिनीवर लागले होते. महसूल अधिकाऱ्याने पुन्हा त्यांचे नाव जमिनीवरून काढून टाकले. त्याविरोधात अपील केले आणि तडजोडीत प्रकरण मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु सरकारने 28 एकर जमिनीपैकी 5 एकर सुन्नी वक्फ बोर्डाला मशिद बांधण्यासाठी दिली आहे.

त्या अन्यायाविरोधात बहिणींनी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत जमीन कोणालाही हस्तांतरित करू नये, अशी विनंती केली आहे. या प्रश्नी 8 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

Five acres of land allotted for a mosque Two sisters claim 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*