महाराष्ट्रातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प मध्य वैतरणा जलाशयावर उभारण्यात येणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प मध्य वैतरणा जलाशयावर उभारण्यात येणार आहे. मध्य वैतरणा धरणात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि जलविद्युत ऊर्जा असा संकरित वीजनिर्मिती प्रकल्प उभारून रोज 100 मेगावॉट वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. first floating solar power project in Maharashtra will be set up on Madhya Vaitarna reservoir

सौरऊर्जेतून 80 मेगावॉट आणि जलविद्युत प्रकल्पातून 20 मेगावॉट वीजनिर्मिती रोज केली जाणार आहे. हे प्रकल्प उभारून माफक दरात महापालिका ही वीज कंपनीकडून खरेदी करणार आहे. यासाठी शापूरजी पालनजी आणि महालक्ष्मी कोनाल ऊर्जा या संयुक्त भागीदारीतील कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.


तब्बल साडेपाच हजार अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय स्फोटांचा शोध


हा प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनी 536 कोटी रुपये खर्च करणार असून पुढील 25 वर्षे पालिकेला वीज पुरवली जाणार आहे. महापालिका 4.75 रुपये प्रतियुनिट या दराने कंपनीकडून वीज विकत घेणार आहे, असे या प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे.

महापालिकेने हरित ऊर्जा वापरण्यास प्राधान्य दिले आहे. पालिकेच्या भूखंडावर आणि इमारतींवरही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

first floating solar power project in Maharashtra will be set up on Madhya Vaitarna reservoir

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*