पुणे तेथे काय उणे ; देशांतर्गत वापरासाठी सिरमच्या कोरोना वॅक्सिनची पहिली खेप रवाना


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ‘कोविडशल्ड’ लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. आज पहाटे 4. 50 मिनीटांनी हे ट्रक रवाना करण्यात आले आहेत. पोलिसांच्या सुरक्षेत हे ट्रक पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचवण्यात आले .त्यानंतर कार्गो विमानांद्वारे ही लस देशभरात पाठवली जाणार आहे. यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. first batch of serum corona vaccine was dispatched

पोलिसांनी आधी लस घेऊन जाणाऱ्या गाडीची पुजा केली. केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणे सुरु करण्यात आले आहे.


कोरोनाविरोधी लस घेण्यासाठी पुढे या; आयएमएचे कर्मचाऱ्यांना आवाहन


दरम्यान, या लसीचा वापर हा पहिल्या टप्यात कोरोना योद्ध्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यातील 65 लाख डोस इतर राज्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या लस प्रथम दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरू, करनाल, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर याठिकाणी पोहचवण्यात येणार आहेत.

first batch of serum corona vaccine was dispatched

पुण्याहून दोन मालवाहू उड्डाणांसह आठ व्यावसायिक उड्डाणे, प्रथम कार्गो उड्डाण हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर आणि दुसरे मालवाहू उड्डाण कोलकाता आणि गुवाहाटीला होणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था