fire on the set of Aadipurush in Goregaon Filmcity : गोरेगाव फिल्मसिटीत उभारण्यात आलेल्या ‘आदिपुरुष’च्या सेटला भीषण आग, सेटवर प्रभास आणि सैफ अली खान

आदिपुरुष या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजच मुंबईत सुरुवात झाली होती. अभिनेता प्रभासने स्वतः सोशल मीडियावर चित्रीकरण सुरु झाल्याचे जाहीर केले होते. प्रभासने चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर करत ‘आदिपुरुष आरंभ’ असे कॅप्शन दिले होते.fire on the set of Aadipurush in Goregaon Filmcity


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गोरेगाव भागातील एका स्टुडिओच्या भागाला भीषण आग लागली. येेथेच आगामी ‘आदिपुरुष’ या मेगा बजेट चित्रपटाचा सेट बनवण्यात आला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभाष आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.

दुपारी सवा चार वाजताच्या सुमारास ही आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला जवळजवळ दोन तासांचा कालावधी लागला.

अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, ही लेव्हल 2 ची आग आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आग विझविण्यासाठी पोहोचल्या आहेत. लक्ष्मी पार्कमध्ये तयार करण्यात आलेल्या या सेटवर जेव्हा आग लागली तेव्हा 400 हून अधिक लोक तिथे उपस्थित होते. सर्वांना सुखरुप तेथून बाहेर काढण्यात आले आहे. आगीमुळे स्टुडिओचे बरेच नुकसान झाले.

संपूर्ण सेट लाकूड आणि ताडपत्रीने तयार करण्यात आला होता. आगीची घटना घडली तेव्हा आदिपुरुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे प्रभास आणि सैफ अली खान घटनास्थळी हजर होते. जवळपास 400 जण यावेळी तेथे उपस्थित होते. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही.

fire on the set of Aadipurush in Goregaon Filmcity

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*