Finance Minister Nirmala Sitharaman's in Rajya Sabha says, Mallya-Modi and Mehul's all are coming to face the law

राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची गर्जना, मल्ल्या-मोदी आणि मेहुल यांना स्वदेशात आणण्याची तयारी सुरू

राज्यसभेत कॉंग्रेससह विरोधी पक्षातील सदस्यांनी गुरुवारी विमा (संशोधन) विधेयकाला विरोध दर्शवत गोंधळ घातला, यामुळे दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीनंतर सभागृह चारवेळा तहकूब करावे लागले. परंतु, पुन्हा सुरू झालेल्या कार्यवाहीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. केंद्रीय अर्थमंत्री वरिष्ठ सभागृहात म्हणाल्या की, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी… सर्व जणांना भारतीय कायद्याचा सामना करण्यासाठी येथे आणले जात आहे. Finance Minister Nirmala Sitharaman’s in Rajya Sabha says, Mallya-Modi and Mehul’s all are coming to face the law


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यसभेत कॉंग्रेससह विरोधी पक्षातील सदस्यांनी गुरुवारी विमा (संशोधन) विधेयकाला विरोध दर्शवत गोंधळ घातला, यामुळे दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीनंतर सभागृह चारवेळा तहकूब करावे लागले. परंतु, पुन्हा सुरू झालेल्या कार्यवाहीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. केंद्रीय अर्थमंत्री वरिष्ठ सभागृहात म्हणाल्या की, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी… सर्व जणांना भारतीय कायद्याचा सामना करण्यासाठी येथे आणले जात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी विमा (संशोधन) विधेयक 2021 चर्चेसाठी ठेवले. विधेयकात एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी हे विधेयक मंजूर झाले.भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक : सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान सांगितले की, विमा क्षेत्रात एफडीआय मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढविल्यास या क्षेत्रातील कंपन्यांची वाढती भांडवली गरज भागविण्यास मदत होईल.

त्या म्हणाल्या की, विमा क्षेत्राच्या नियामकाने सर्व पक्षांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर या क्षेत्रात एफडीआय मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये जेव्हा विमा क्षेत्रात एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत वाढवली गेली, तेव्हापासून 26 हजार कोटींची गुंतवणूक आली.

मल्ल्या, मोदी आणि मेहुल यांना कायद्याचा सामना करावा लागेल

अर्थमंत्री सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले की, विमा कंपन्यांमध्ये तरलतेचा दबाव आहे. याचदरम्यान विरोधकांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी या सर्वांना भारतीय कायद्याचा सामना करण्यासाठी येथे आणले जात आहे.

सभागृहाचे कामकाज तहकूब, विधेयक मंजूर

राज्यसभेतील विरोधकांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी विमा (संशोधन) विधेयक मंजूर झाले. यानंतर सभागृहाची कार्यवाही शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

Finance Minister Nirmala Sitharaman’s in Rajya Sabha says, Mallya-Modi and Mehul’s all are coming to face the law

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*