उर्जामंत्र्यांवर ४२० गिरीचे गुन्हे दाखल करा, वाढीव वीज बिलाविरोधात राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन


वाढीव वीजबील प्रकरणात मनसेने नवी भूमिका जाहीर केली आहे. उद्योगपती अडाणी आणि उर्जामंत्र्यां विरोधात राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. File 420 cases against the energy minister


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वाढीव वीजबील प्रकरणात मनसेने नवी भूमिका जाहीर केली आहे. उद्योगपती अडाणी आणि उर्जामंत्र्यां विरोधात राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बीलासंदर्भात यूटर्न घेतल्याने त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहेत.

कोरोना संसर्गाच्या काळात सर्वसामान्य लोकांना वाढीव बीजबील आलं. हेच वाढीव वीजबील कमी करुन लोकांना दिलासा देऊ, असं आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं होतं. मात्र काहीच दिवसांत त्यांनी त्यांच्या आश्वासनावरुन यू-टर्न घेतला. आपल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे लक्षात आल्यानंतर उर्जामंत्र्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला.

वीज ग्राहकांनी वीज बिल भरलं नाहीतर महावितरणनं वीज कापण्याचा इशारा दिलाय. सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचं सांगत सरकारने भानावर येऊन ज्या जनतेने आपल्याला सेवेची संधी दिलीय त्या जनतेच्या भल्याचे निर्णय घ्यावेत, असं मनसेने म्हटलं आहे.
वीज बिल भरलं नाही तर वीज तोडण्याचा सरकारचा निर्णय हा तुघलकी स्वरुपाचा आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? असा सवाल करत या सरकारला लोकांना निश्चितपणे अंधारात ढकलायचं आहे. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आल्याचं दाखवतं आहे मात्र हे तर तीन पक्षांच्या भल्यासाठी आलेले सरकार आहे. जनतेने सरकारला गाडून टाकावं, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली.

मनसे वीज बीलप्रश्नी रस्त्यावर उतरली, आंदोलन केले, निवेदन दिले हात जोडले, मनसेने वीज बिल प्रश्नी काय आणखी काय करायला पाहिजे, असा सवाल नांदगावकरांनी केला. हे सरकार लोकांना अंधारात ढकलणार असेल तर लोकांनीही राज्य सरकारला अंधारात ढकलायला तयार राहिले पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले.

File 420 cases against the energy minister

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था