वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोनाचे संकट निर्माण केल्यावर प्रत्येक देशांबरोबर कुरापती काढून त्यांना त्रास देण्याचे सत्र आरंभले आहे. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी अमेरिकेने चीनच्या समुद्रात लढाऊ विमाने आणि जहाजे तैनात केली आहेत. Fighter jets, ships deployed, America’s unequivocal answer to China
चीनचा त्याच्या सीमेवर असणाऱ्या प्रत्येक देशाशी तंटा आहे. भारत, नेपाळ, भूतान, जपान, तैवानसह अन्य देशांबरोबर सीमा तंटे आहेत. यावरून तो या देशाना एक तर धमकावत असतो किंवा कुरापती काढतो. त्यामुळे अनेक देशांनी या धमकीला बळी न पडता उत्तर ही दिले आहे. भारत चीन सीमेवरील डोकलाम किंवा लडाख भागात भारताने चोख उत्तर दिले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रपातीपदाची पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जो बायडेन यांनी चिनी समुद्रात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी चीनच्या विस्तारवादी धोरण मोडून काढण्याचे ठरविले असून लढाऊ विमाने आणि जहाजे तैनात केली आहेत.
Fighter jets, ships deployed, America’s unequivocal answer to China
