भवानी देवीने रचला इतिहास!ओलिंपिकमध्ये क्वालिफाय करणारी पहिली भारतीय तलवारबाज

  • भारताची आंतरराष्ट्रीय महिला तलवारबाज भवानी देवीने (Bhavani Devi) इतिहास रचला आहे. तिने यावर्षी 23 जुलैपासून सुरू होणार्‍या टोकियो ओलिंपिकसाठी क्वाॅलिफाय केले आहे.
  • भवानीने आपल्या परिश्रम आणि दृढनिश्चयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून भारताला एक नवीन ओळख दिली आहे. तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या भवानीला आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळविण्यात अपयश आले . तथापि तीने हार मानली नाही आणि टोकियो गेम्ससाठी पात्रता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि इटलीमध्ये प्रशिक्षण सुरू ठेवले.

वृत्तसंस्था

टोकियो: भारताची आंतरराष्ट्रीय महिला तलवारबाज भवानी देवीने (Bhavani Devi) इतिहास रचला आहे. तिने यावर्षी 23 जुलैपासून सुरू होणार्‍या टोकियो ओलिंपिकसाठी क्वालिफाय केले आहे. तसेच भवानी ओलिंपिकमध्ये क्वाॅलिफाय करणारी पहिली भारतीय तलवारबाज (Becomes First Indian Fencer To Qualify For Olympics) ठरली आहे. फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाने याची पुष्टी केली आहे. Fencer Bhavani Devi Qualifies for Olympics 2021

चेन्नईच्या 27 वर्षीय भवानीने रविवारी बुडापेस्ट विश्वचषकात शानदार प्रदर्शन करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली. बुडापेस्ट विश्वचषक ही ऑलिम्पिक क्वालिफायिंग स्पर्धा आहे. भवानीच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी भवानी देवीचे ओलिंपिक पात्रता केल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी ट्वीट केले की, ‘टोकियो ओलिंपिकसाठी पात्र झालेल्या भारतीय कुस्तीपटू भवानी देवीचे अभिनंदन! ही कामगिरी साधणारी ती पहिली भारतीय फेंसर बनली आहे.

आशिया ओशनिया समूहामध्ये ओलिंपिकच्या दोन जागा होत्या. जपानच्या तलवारदाराला पहिली जागा मिळाली तर, दुसरी जागा भवानीला मिळाली, असे फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस बशीर अहमद खान यांनी आयएएनएसला सांगितले आहे

भवानी बुडापेस्टमध्ये होणाऱ्या विश्वचषक टूर्नामेन्टसाठी इटली येथे प्रक्षिक्षण घेत होती. ती 9 मार्चला बुडापेस्ट येथे पोहचली. कोरोनामुळे हंगरी येथील सीमा बंद होत्या. परंतु, कडक निर्बंध लावून ऍथलीट्सना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, असेही बशीर अहमद खान म्हणाले.

भवानी देवीने आठ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली आहे. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये तिने एक रजत आणि कांस्य पदक कमावले आहे. 2010 च्या एशियन तलवारबाजी स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकले होते. 2014 च्या आशीयाई स्पर्धेत एकेरी मध्ये रजत, तर कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

Fencer Bhavani Devi Qualifies for Olympics 2021

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*