परमबीर सिंग यांच्या अटकेच्या भीतीने ठाकरे – पवार सरकारकडून त्यांची बदली!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसुख हिरेन – सचिन वाझे प्रकरणातले धागेदोरे एका पाठोपाठ एक उलगडून त्याचा फास ठाकरे – पवार सरकारभोवती बसत असतानाच एक नवा खुलासा समोर आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना पाठीशी घालण्याच्या प्रकारातून खुद्द त्यांच्याच अटकेची नौबत आली होती आणि म्हणूनच त्यांची बदली करावी लागली, हा तो खुलासा होय…!! Fear of arrest of Parambir Singh, Thackeray-Pawar government to replace him !!

स्कॉर्पिओ – इनोव्हा गूढाभोवती परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचाच हात असल्याचे भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागले. हा तपास एनआयएने एवढ्या वेगाने केला की महाविकास आघाडीच्या नेत्यांना चकीत व्हायची पाळी आली. त्यात पोलीसांकडून त्यांना “हवे तसे इनपूट” मिळेनासे झाले.



सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात आणि परमबीर सिंग बाहेर. वाझे एनआयएच्या चौकशीत कोणाची नावे घेतात… काय कबूल करून बसतात… याची त्यांच्या राजकीय बॉसबरोबरच पोलीसांच्या बॉसलाही धास्ती होती… कारण सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची वाझेच्या अटकेपूर्वी भेट झाली होती. ही भेट फारशी कोणाला माहिती नव्हती… ती बाहेर येऊ दिली नव्हती.

वाझेंनी अँटिलिया समोर जिलेटिन ठेवलेली स्कॉर्पिओ पार्क केली. त्यातून भीती दाखवायची होती. पण ती निरूपद्रवी ठरली. वाझेंनीच इनोव्हा अरेंज केली. तिचे गूढ परमबीर सिंग यांना माहिती होते. ती इनोव्हा भायखळ्यातल्या पोलीस मुख्यालयात असल्याचे परमबीर सिंग यांना माहिती होते… वाझेंची आणि त्यांची भेट होऊन चर्चा झाली होती. या सगळ्या बाबी आता उघड होत आहेत. फ्री प्रेस जर्नलने ही बातमी दिली आहे.

पण याचाच अर्थ पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांनी वाझेंना पाठीशी घातले होते, हेच यातून स्पष्ट होत आहे. ही नुसती कर्तव्यात कसूर नाही, तर गुन्हेगार माहिती असूनही त्याला संरक्षण देण्याचा प्रकार होता. त्याने चौकशीत काही कबूल करू नये, यासाठी दबाव आणण्याचा प्रकार होता. हे कृत्य परमबीर सिंग यांनी केले होते. एनआयएकडून त्यांच्या अटकेसाठी एवढे पुरेसे आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर असताना त्यांच्या अटकेची वेळ आली असती, तर त्याच्याएवढी दुसरी ठाकरे – पवार सरकारची दुसरी नाचक्की नव्हती. निदान ही नाचक्की टाळण्यासाठी अखेर सरकारला परमबीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

पण वाझे – परमबीर सिंग या जोडगोळीविरोधात एवढे पुरावे, कबूलीनामे असताना त्यांच्यावरची अटकेची कारवाई टाळता येईल…??… ठाकरे – पवार सरकारची नाचक्की टाळता येईल…??

Fear of arrest of Parambir Singh, Thackeray-Pawar government to replace him !!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*