भय इथले संपत नाही: महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी ; महिलाअत्याचारात वाढ ; सरकारला जाग कधी येणार

  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारसह सगळ्यांचं लक्ष राज्यातील एका महत्त्वाच्या विषयाकडे वेधून घेतलं आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत राज्यात झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा हवाला देत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? हे कधीपर्यंत असंच चालणार?

  • प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून १२ मार्चपर्यंत घडलेल्या महिला अत्याचाराच्या काही घटनांकडेही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी अशा मथळ्याखाली काही घटनांचा उल्लेख पाटील यांनी केला आहे. Fear does not end here: Maharashtra is becoming the capital of crime

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा हवाला देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी ट्विट केलं आहे तर त्या ट्विटमध्ये त्यांनी मार्च महिन्यात राज्यात घडलेल्या महिला अत्याचारांबाबतचा अहवाल दिला आहे.

राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा 10-12 दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी अशा तिखट शब्दात त्यांनी टीका केली आहे.2 मार्चला जम्बो कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉयकडून महिलेचा विनयभंग तर 3 मार्चला औरंगाबादमध्ये करोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न, 4 मार्चला जळगावमध्ये पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचवलं, 6 मार्चला  शिक्षिकेचा विनयभंग करून तिला धमकी देण्यात आली, 7 मार्च -पैशांसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला,  8 मार्चला महाबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केला, 11 मार्चला 7 महिन्यांच्या बाळासह महिलेची गळफास लावून आत्महत्या आणि12 मार्चला पित्याकडून मुलीवर अत्याचार या घटनांचा हवाला देत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार?, या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार असून  झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार असे सवाल पाटलांनी सरकारला केले आहेत.

Fear does not end here : Maharashtra is becoming the capital of crime

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*