Farmers Violence : ज्यांना एवढ्या दिवसांपासून अन्नदाते म्हणालो, ते आज उग्रवादी असल्याचे सिद्ध झाले – संबित पात्रा

Farmers Violence: Sambit Patra Says Dont Call Them Annadata They Are extremists

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर म्हटले की, “ज्यांना आपण एवढ्या दिवसांपासून अन्नदाते म्हणत होतो, ते आज अतिरेकी ठरले.” पात्रा यांनी ट्वीट करून म्हटले की, “अन्नदात्यांची बदनामी करू नका, अतिरेक्यांना फक्त अतिरेकीच म्हणा!” Farmers Violence: Sambit Patra Says Dont Call Them Annadata They Are extremists


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर म्हटले की, “ज्यांना आपण एवढ्या दिवसांपासून अन्नदाते म्हणत होतो, ते आज अतिरेकी ठरले.” पात्रा यांनी ट्वीट करून म्हटले की, “अन्नदात्यांची बदनामी करू नका, अतिरेक्यांना फक्त अतिरेकीच म्हणा!”दरम्यान, मंगळवारी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टरवर स्वार होऊन हजारो शेतकरी लाल किल्ल्याला वेढा घालण्यासाठी विविध सीमारेषांकडून राष्ट्रीय राजधानीत घुसले. त्यांनी बॅरिकेड‌्स मोडून काढत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोलिसांवर हल्ला चढवला. लाल किल्ल्यातील ध्वजस्तंभावर शेतकऱ्यांनी चढून संघटनेचा झेंडाही फडकावला.

Farmers Violence: Sambit Patra Says Don’t Call Them Annadata They Are extremists

ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 86 पोलीस जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जाते. सिव्हिल लाइन हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये 45 पोलिसांना दाखल करण्यात आले आहे. तर एलएनजेपी रुग्णालयात 18 पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

Farmers Violence: 8 buses, 17 vehicles, 4 containers and more than 300 barricades broken in tractor rally, 7 FIRs lodged

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती