Farmers Violence : अशा मौनी मुख्यमंत्र्याची लाज वाटते, केजरीवालांना फक्त पंजाबातील मतांचीच चिंता, खासदार गौतम गंभीर यांचे टीकास्त्र

Farmers Violence: MP Gautam Gambhir says Delhi Ashamed Of Such a silent CM, Kejriwal only worried about votes in Punjab

माजी क्रिकेटपटू व खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीत उसळलेल्या हिंसेनंतरही मौन धारण केलेल्या केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर चकार शब्दही न काढणाऱ्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर चढवत भाजपचे खासदार गंभीर म्हणाले की, त्यांना फक्त पंजाबमधील मतांची चिंता आहे. म्हणून ते गप्प आहेत. Farmers Violence: MP Gautam Gambhir says Delhi Ashamed Of Such a silent CM, Kejriwal only worried about votes in Punjab


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू व खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीत उसळलेल्या हिंसेनंतरही मौन धारण केलेल्या केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर चकार शब्दही न काढणाऱ्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर चढवत भाजपचे खासदार गंभीर म्हणाले की, त्यांना फक्त पंजाबमधील मतांची चिंता आहे. म्हणून ते गप्प आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण दिवसात शेतकरी ट्रॅक्टर रॅली आणि दिल्लीतील हिंसाचार सुरू होता. मंगळवारी रात्री गौतम गंभीर यांनी ट्विट केले की, संपूर्ण दिवस निघून गेला, परंतु मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उद्ध्वस्त करणाऱ्या जमावाविरुद्ध चकार शब्दही काढला नाही. पक्षाच्या हँडलमधून एक सौम्य विधान पुरेसे आहे? त्यांना पंजाबातील मतांचीच काळजी वाटतेय. अशा मौनी मुख्यमंत्र्याची दिल्लीला लाज वाटते.”तत्पूर्वी, काही तासांपूर्वीच दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी लाल किल्ल्यावरील आंदोलकांच्या वतीने झेंडा फडकावण्याचा निषेध केला आणि ट्विट केले की, ‘लाल किल्ल्यावरील तिरंगा सोडून इतर कोणतीही गोष्ट असणे या देशातील प्रत्येकाचा अपमान आहे! तथाकथित “नेते” आणि छद्म-उदारमतवादी सहानुभूती ठेवणारे कुठे आहेत?’

यापूर्वी गंभीर यांनी हिंसाचाराचा निषेध करताना म्हटले होते की, “हिंसा आणि तोडफोड आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाही. मी सर्वांना शांतता व सुरक्षितेचे आवाहन करतो. आज अनागोंदीचा दिवस नाही.”

Farmers Violence: MP Gautam Gambhir says Delhi Ashamed Of Such a silent CM, Kejriwal only worried about votes in Punjab

सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी दिल्लीतील हिंसाचाराचा सौम्य निषेध करत म्हटले आहे की, आम्ही या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. केंद्र सरकारने या मर्यादेपर्यंत परिस्थिती बिघडू दिली आहे ही खेदाची बाब आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन शांततेत आहे. शेतकरी नेत्यांनी असे म्हटले आहे की जे लोक हिंसाचारात सहभागी होते, ते या चळवळीचा भाग नव्हते आणि ते बाह्य घटक होते.

Farmers Violence: MP Gautam Gambhir says Delhi Ashamed Of Such a silent CM, Kejriwal only worried about votes in Punjab

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था