Farmers Violence : आतापर्यंत 300 हून जास्त पोलीस जखमी, 22 FIR दाखल, दिल्ली पोलिसांची माहिती

Farmers Violence: More than 300 police injured so far, 22 FIRs filed, Delhi Police information

प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात तीनशेहून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलोईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारादरम्यान हे पोलिस कर्मचारी जखमी झाले. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराबाबत दिल्ली पोलीस आज पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Farmers Violence: More than 300 police injured so far, 22 FIRs filed, Delhi Police information


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात तीनशेहून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलोईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारादरम्यान हे पोलिस कर्मचारी जखमी झाले. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराबाबत दिल्ली पोलीस आज पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आयुक्त सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत आहेत.

दिल्ली पोलिसांतील दोन सीनियर पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यातील एकावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. डीसीपी नॉर्थच्या स्टाफ ऑफिसरलाही दुखापत झाली आहे. हिंसाचारात उत्तर दिल्लीतील 41 पोलीस, पूर्व दिल्लीत 34, पश्चिम दिल्लीत 27, द्वारकामधील 32, बाह्य-उत्तर जिल्ह्यात 12, शाहदरामधील 12, दक्षिण जिल्ह्यात 4 आणि दिल्लीबाहेरच्या जिल्ह्यांमध्ये 75 पोलीस जखमी झाल्याची दिल्ली पोलिसांनी दिली आहे.


Farmers violence : पवार-राऊत कुठे फेडाल हे पाप? दिल्ली हिंसाचारातील जखमी पोलिसांबद्दल मौन का? आशिष शेलारांचा घणाघात


हिंसाचारानंतर राजधानीचे रूपांतर छावणीत झाले. दिल्लीत पोलीस दलासह सीआरपीएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हिंसाचारादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणानंतर आतापर्यंत 22 एफआयआर दाखल केल्या आहेत.

Farmers Violence: More than 300 police injured so far, 22 FIRs filed, Delhi Police information

प्रजासत्ताक दिनी काल शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. रॅलीदरम्यान शेतकरी राजधानी दिल्लीत घुसले आणि लाल किल्ल्यावर गोंधळ घातला. निषेध करणार्‍या शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यावर चढून खालसा पंथाचा झेंडा फडकावला. यादरम्यान पोलीस दल आणि आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही आंदोलनकर्ते तर पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न करताना दिसले. रात्री उशिरापर्यंत सर्व आंदोलकांना लाल किल्ल्यावरून हाकलून लावण्यात आले. विरोधक या सर्व घटनेचे खापर केंद्रावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अद्याप जखमी पोलिसांबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसलेले नाहीत.

Farmers Violence: More than 300 police injured so far, 22 FIRs filed, Delhi Police information

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था