Farmers Violence : ट्रॅक्टर रॅलीत 8 बसेस, 17 वाहने, 4 कंटेनर आणि 300 हून अधिक बॅरिकेड्स तोडले, 7 एफआयआर दाखल

Farmers Violence: 8 buses, 17 vehicles, 4 containers and more than 300 barricades broken in tractor rally, 7 FIRs lodged

मंगळवारी दिल्लीच्या विविध भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी एकूण 7 एफआयआर नोंदवल्या आहेत. आतापर्यंत 86 पोलीस जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जाते. सिव्हिल लाइन हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये 45 पोलिसांना दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी एलएनजेपी रुग्णालयात 18 पोलीस दाखल आहेत. Farmers Violence: 8 buses, 17 vehicles, 4 containers and more than 300 barricades broken in tractor rally, 7 FIRs lodged


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मंगळवारी दिल्लीच्या विविध भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी एकूण 7 एफआयआर नोंदवल्या आहेत. 4 इस्टर्न रेंज, एक द्वारकाच्या बाबा हरिदास नगर पोलिस ठाण्यात, एक नजफगडमध्ये, एक उत्तम नगर येथे नोंदवण्यात आली. दिल्लीतील हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 4 एफआयआर नोंदवल्या आहेत. त्यापैकी पांडव नगर, दोन गाजीपूर पोलीस ठाणे व एक सीमापुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 8 बसेस, 17 वाहने, 4 कंटेनर आणि 300 हून अधिक बॅरिकेड्स तोडल्याचा आरोप आंदोलकांवर आहे.याचबरोबर ट्रॅक्टर परेड हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसांची संख्या वाढत असल्याचेही सांगितले जात आहे. आतापर्यंत 86 पोलीस जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जाते. सिव्हिल लाइन हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये 45 पोलिसांना दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी एलएनजेपी रुग्णालयात 18 पोलीस दाखल आहेत. ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारात दिल्ली पोलिसांचे 83 कर्मचारी जखमी झाले. नॉार्थ डिस्ट्रिक्टच्या 45 पोलिसांना सिव्हिल लाइन रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याचवेळी एलएनजेपी रुग्णालयात 18 पोलिस दाखल आहेत. अनेक पोलिसांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Farmers Violence: 8 buses, 17 vehicles, 4 containers and more than 300 barricades broken in tractor rally, 7 FIRs lodged

Farmers Violence: 8 buses, 17 vehicles, 4 containers and more than 300 barricades broken in tractor rally, 7 FIRs lodged

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती