अपात्र शेतकऱ्यांनी घेतला पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ, २३२६ कोटी रुपये लाटल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत बोगस शेतकरी घुसले असून त्यांनी २३२६ कोटी रुपये लाटल्याचा गौप्यस्फोट कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला आहे. आयकर भरणारे अनेक शेतकरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्य सरकारांनी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत, असे तोमर यांनी सांगितले.farmers took advantage of PM Shetkari Sanman Yojana Union Agriculture Minister informed


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत बोगस शेतकरी घुसले असून त्यांना २३२६ कोटी रुपये लाटल्याचा गौप्यस्फोट कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला आहे. आयकर भरणारे अनेक शेतकरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्य सरकारांनी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत, असे तोमर यांनी सांगितले.

नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी संसदेत बोलताना सांगितले की अनेक अपात्र लोक या योजनेचा फायदा घेत आहेत. आत्तापर्यंत ३२.९१ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २.३२६ कोटी रुपये गेले आहेत. त्यांचा राज्य सरकारांनी शोध घेतला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पैसे वसूल केले पाहिजेत.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविली जाते. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्याला दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपये टाकले जातात. अधिकाऱ्यांकडून याची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 32 कोटी 91 लाख 152 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार 326 कोटी 88 लाख रुपये हस्तांतरीत झाल्याचे तोमर यांनी सांगितले.

तोमर म्हणाले की, काही राज्यांत तालुका आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून अपात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला. राज्य सरकार आता त्यांच्यावर कारवाई करत आहेत. तामीळनाडू सरकारने आत्तापर्यंत सहा लाख अपात्र शेतकऱ्यांना शोधले असून त्यांच्याकडून १५८ कोटी ५७ लाख रुपये वसूल केले आहेत.

farmers took advantage of PM Shetkari Sanman Yojana Union Agriculture Minister informed

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*