प्रजासत्ताक दिनी आश्वासन मोडून ट्रॅक्टर मोर्चा थेट लाल किल्यापर्यंत नेणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये गोंधळ घालू नये यासाठीच दिल्लीच्या सिमेवर खिळे लावले असून कॉंक्रिटची भिंत उभारण्यात आली आहे. माध्यमांना हे दिसले परंतु त्यांना पोलीसांवर झालेले हल्ले दिसले नाहीत का असा सवाल दिल्ली पोलीसांनी केला आहे.Farmers should not make a fuss in Delhi by breaking tracts on Republic Day
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी आश्वासन मोडून ट्रॅक्टर मोर्चा थेट लाल किल्यापर्यंत नेणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये गोंधळ घालू नये यासाठीच दिल्लीच्या सिमेवर खिळे लावले असून कॉंक्रिटची भिंत उभारण्यात आली आहे. माध्यमांना हे दिसले परंतु त्यांना पोलीसांवर झालेले हल्ले दिसले नाहीत का असा सवाल दिल्ली पोलीसांनी केला आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव म्हणाले, २६ जानेवारीला पोलीसांवर हल्ला करण्यात आला. बॅरिकेडस तोडून आंदोलक हिंसक झाले. त्याच्यावर कोणी काही बोलत नाही.
दिल्ली पोलीसांतील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, ट्रॅक्टरचा वापर पोलीसांवर हल्ला करण्यासाठी करण्यात आला तेव्हा कोणत्याही माध्यमाने आवाज उठविला नाही. २६ जानेवारीला बॅरिकेडस तोडण्यात आले त्यावरही कोणी काही बोलले नाही. परंतु, आम्ही केवळ बॅरिकेडिंग मजबूत केले तेव्हा मात्र त्यावर प्रश्न विचारले जात आहेत.
सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठ्या खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. तारेची कुंपणेही उभारण्यात आली आहेत. पोलीस आणि निमलष्करी जवानांनीही आंदोलनस्थळांभोवती किमान चारस्तरीय कडे केले आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्यासाठी नियोजित मार्ग आखून दिला होता. मात्र, शेतकऱ्यांनी आश्वासनाचा भंग करून लाल किल्याकडे कुच केले. सहा फेब्रुवारीला होणाऱ्या चक्का जामच्या वेळीही शेतकऱ्यांकडून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी असाच प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी काळजी घेतली आहे.
दरम्यान प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीसांनी केलेल्या कारवाईचे गृह विभागाने समर्थ केले आहे. शेतकऱ्यांच्या कृतीमुळे दिल्ली पोलिसांसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे मारले व जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला. शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात आले नाही. कोविड-१९ चे निर्बंध असतानाही, चेहऱ्यावरील मास्कशिवाय मोठया प्रमाणावर शेतकरी जमा झाले होते, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
शेतकरी सरकारी मालमत्तेचे नुकसान करत होते, त्यावेळी पोलिसांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता असे गृह मंत्रालयाने ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान पोलिस कारवाईच्या प्रश्नावर सांगितले.