वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेसार राज्यसभा खासदार संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. ही माहिती राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे. farmers Sanjay Raut on the Ghazipur border today
दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला शिवसेनेचा देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी ही भेट घेण्याचे ठरविले आहे.
संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत.