शेतकरी आंदोलनाची गत तबलिगी जमातीच्या कोरोना पसरविणाऱ्या मेळाव्यासारखी होऊ नये; सर्वोच्च न्यायालयाचा गंभीर इशारा; आंदोलकांसाठी कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूची जारी करण्याचीही सूचना

दिल्लीच्या सीमेवर जमलेल्या शेतकरी आंदोलनाची गत तबलिगी जमातीच्या कोरोना पसरविणाऱ्या मेळाव्यासारखी होऊ देऊ नये, असा गंभीर इशारा सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. केंद्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. Farmers Protest should not be like the gathering of the Tablighi jamat spreading corona; Supreme Court Warns


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर जमलेल्या शेतकरी आंदोलनाची गत तबलिगी जमातीच्या कोरोना पसरविणाऱ्या मेळाव्यासारखी होऊ देऊ नये, असा गंभीर इशारा सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. केंद्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

सरन्यायाधीश एस. ए, बोबडे यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना परिस्थितीची माहिती न्यायालयाला सादर करण्यास सांगितले. तबलिगी जमातीने निजामुद्दीन मरकजमध्ये ऐन कोरोना काळात धार्मिक मेळावे घेतले. त्यातून दिल्ली आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाला होता.न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांनी विचारणा केली की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर जमलेले शेतकरी आंदोलक पुरेशी काळजी घेताहेत की नाही, यावर मेहता यांनी नकारात्मक उत्तर दिले. त्यावरच तीनही न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निजामुद्दीन मरकजचे उदाहऱण देऊन तशी परिस्थिती शेतकरी आंदोलनातून उदभवू नये, असा गंभीर इशारा केंद्र सरकार आणि शेतकऱी आंदोलकांना दिला.

Farmers Protest should not be like the gathering of the Tablighi jamat spreading corona; Supreme Court Warns

वकील सुप्रिया पंडित आणि ओमप्रकाश परिहार यांनी कोरोना फैलाव रोखण्याबाबत निजामुद्दीन मरकजविरोधात केस फाइल केली होती, त्यावर सुनावणीच्या वेळी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करून खंडपीठाने केंद्र सरकारला वरील इशारा दिला तसेच आंदोलकांसाठी कोरोना मार्गदर्शक सूची जारी करण्याचीही सूचना केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*