वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाबाबत सरकार संवेदनशील नाही. शांतीपूर्ण आंदोलनाचा मार्ग शेतकऱ्यांनी सोडला तर देशात मोठे संकट निर्माण होईल आणि त्याला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.farmers movement erupts Center responsible Sharad Pawar warning
रस्त्यावर बेरिकेड्स, तारा आणि खिळे ठोकण्याचा निर्णयाचा पवार यांनी निषेध केला. तसेच असा प्रकार इंग्रजांच्या काळातही झाला नव्हता, असे सांगताना ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांचे मुद्दे सोडविण्यास इच्छूक नाही.
विरोधी पक्षांच्या 10 खासदारांना आंदोलकांना भेटू दिले नाही म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ गेले होते.परंतु, त्यांना अडविण्यात आले. लोकशाहीमध्ये असा प्रकार होत असेल तर सरकारला महागात पडेल, असे त्यांनी सांगितले.