शेतकरी आंदोलनादरम्यानही सरकारची शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता पोहोचविण्यासाठी गडबड


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : नवी दिल्लीसह विविध शहरांत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारकडून या काळातही प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा मार्चचा हप्ता प्रत्येकाच्या खात्यात पोहोचविण्यासाठी गडबड उडाली आहे. कोरोना काळात सरकारचे उत्पन्न कमी झाले असले तरी त्यासाठी निधी कमी पडू नये असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. farmers agitation government Deliver the installment of the KISAN SANMAN NIDHI

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीचा सातवा हप्ता लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. मार्च 2021 पर्यंत 11 कोटी शेतकºयांच्या खात्यात प्रत्येक 2 हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत. शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यात जाते.आतापर्यंत 9 कोटी 41 लाख 90 हजार 188 शेतकºयांच्या खात्यात 2 हजार रुपयांच्या सातवा हप्ता पोहोचला आहे. अजून 1.6 कोटी शेतकरी बाकी आहेत. त्यामुळे सरकारनं आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची तयारी चालवली आहे. ज्या शेतकºयाचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे त्यांच्या खात्यात मार्च पर्यंत ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे.

सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेद्वारे शेतकºयांना वर्षभरात 3 हप्त्यात 6 हजार रुपये दिले जातात. त्यातील पहिला हप्ता हा 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान जमा केला जातो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा हप्ता 1 आॅगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकºयांच्या खात्यात जमा केला जातो.

farmers agitation government Deliver the installment of the KISAN SANMAN NIDHI

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था