शेतकऱ्यांना मोदी सरकारची भेट, १० हजार शेतकरी उत्पादन संघटना स्थापन करणार


चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मोदी सरकारने भेट दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी देशात १० हजार शेतकरी उत्पादन संघटना स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मोदी सरकारने भेट दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी देशात १० हजार शेतकरी उत्पादन संघटना स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली.

तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्यांसोबत बैठक घेतली. केंद्र सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीला कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी देखील उपस्थित होते. सर्व राज्यांचे कृषीमंत्री आणि कृषीविभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते एका पुस्तिकेचेही प्रकाशन झाले.

देशातील 10 हजार कृषी उत्पादन संघटनांच्या उभारणीला चालना देण्यासाठीच्या कार्यपद्धतीविषयक मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत १० हजार शेतकरी संघटना स्थापन करण्याचा सरकारचा संकल्प आहे. पाच वर्षांकरिता या सर्व संघटनांना सरकारकडून ६,८६६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल, अशी माहिती तोमर यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

देशात लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ६० टक्के आहे. शेतकऱ्यांना या संघटनेत सहभागी होता येणार आहेत. एका कृषी उत्पादन संघटनेत १०० ते ३०० शेतकरी सदस्य म्हणून असतील. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना आवश्यक तेवढा निधी देखील देणार आहे, असे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी किमान अकरा शेतकरी एकत्र येऊन अशा प्रकारची कृषी कंपनी किंवा संघटना स्थापन करू शकतात. यात केंद्र सरकार प्रत्येक संघटनेला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी १५ लाख रुपये देणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था