शेतकरी नेत्यांकडून विश्वासघात, हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, दिल्लीच्या पोलीस आयुक्तांचा इशारा


दिल्लीमधील आंदोलनात शेतकरी नेत्यांनी दिलेली आश्वासने मोडून विश्वासघात केला. हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी दिला आहे. farmer leaders responsible for violence warns Delhi Police Commissioner


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीमधील आंदोलनात शेतकरी नेत्यांनी दिलेली आश्वासने मोडून विश्वासघात केला. हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी दिला आहे.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी एस. एन. श्रीवास्तव यांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरले. ते म्हणाले की, शेतकरी नेत्यांनी दिलेली आश्वासनं मोडली, चिथावणीखोर भाषणे दिली आणि यामुळे हिंसाचार सुरू झाला. आमच्याकडे व्हिडीओ फुटेज, गुप्त माहिती असून सर्वांची चौकशी सुरू आहे. जो कोणी या हिंसाचारासाठी जबाबदार असेल त्याला सोडणार नाही.

२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी काही नियम आणि अटी दिल्या होत्या असे सांगून श्रीवास्तव म्हणाले शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली दुपारी १२ वाजता सुरू व्हावी आणि संध्याकाळी ५ वाजता संपली पाहिजे. शेतकरी नेत्यांनी ट्रॅक्टर मोर्चाचे नेतृत्व करावे आणि पुढे रहावे, जेणेकरून ते नियंत्रण ठेवू शकतील. ५ हजारांपेक्षा जास्त ट्रॅक्टर असू नयेत आणि शस्त्रे, भाला, तलवार असे काहीही असू नये. रॅलीत शिस्त राखली गेली पाहिजे राहिली. या सर्व अटींना शेतकरी नेत्यांनी पाच फेऱ्यांच्या बैठकीनंतर मंजुरी दिली.शेतकऱ्यांनी आपल्या आश्वासनांवरून घुमजाव केल्याचं आम्हाला २५ जानेवारीलाच कळलं होतं. उग्र आंदोलकांना त्यांनी पुढे केलं आणि त्यांनी चिथावणीखोर भाषणं केली. यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट झाला. या लोकांनी २६ जानेवारीला सकाळी ६.३० वाजताच सिंघू सीमेवरून मोचार्ला सुरवात केली. नियोजित मार्गावरून न जाता ते दुसऱ्याच मार्गाने घुसले. त्यांचे नेते सतनाम पन्नू यांनी प्रक्षोभक भाषण केले. यामुळे शेतकरी बॅरीकेड्स तोडू लागले. दर्शन पाल यांनीही नियोजित मार्गावर जाण्यास नकार दिला.

ट्रॅक्टर रॅली १२ वाजता सुरू करायचं ठरलं होतं. पण टिकरी आणि गाझीपूर इथून सकाळी ८.३० वाजताच रॅलीला सुरवात केली. ते बॅरिकेडस तोडून पुढे निघाले. त्यांचे नेते सतनामसिंग पन्नू यांनी चिथावणीखोर भाषण दिले. यानंतर हिंसाचार सुरू झाला. टिकरीमधून बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांनी नांगलोई येथे धरणे आंदोलन केले. त्यांनी बॅरिकेड्स फोडून हिंसाचार देखील केला. एका कंटेनरद्वारे त्यांनी रस्तावरील बॅरिकेड्स हटवली आणि लाल किल्ल्यावर पोहोचले. गाझीपूरहून बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांनी अक्षरधाम येथे बॅरीकेड्स तोडले. हे शेतकरीही लाल किल्ल्यावर पोहोचले, असे पोलिस आयुक्त श्रीवास्तव म्हणाले.

हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी संयम राखला. आमच्याकडे सर्व पर्याय होते. पण आम्ही संयम ठेवला. कुठलीही जीवित आणि वित्त हानी होऊ नये, म्हणून आम्ही शांत राहिलो. अटी व शर्ती मान्य न केल्यामुळे हिंसाचार झाला असून सर्व शेतकरी नेते यात सामील आहेत, असा दावा पोलिस आयुक्तांनी केला. दरम्यान, दिल्ली पोलीसांनी हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव तसेच राकेश टिकैत यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हेगारी षडयंत्र, लाल किल्ल्यावर दरोडा, घातक शस्त्रांचा वापर अशा प्रकारच्या विविध १३ कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून दिल्लीत निघणाऱ्या ट्रॅक्टर परेडच्या आयोजनात आयोजक म्हणून या सर्वांची नावं होती. त्यामुळे आयोजकांना याला जबाबदार धरुन या सर्व लोकांची नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली आहेत.

farmer leaders responsible for violence warns Delhi Police Commissioner

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती