farmer Leader Rakesh Tikait canceled the planned Chakka Jam in Delhi

राकेश टिकैत यांना उपरती, दिल्लीतील उद्याचा चक्का जाम केला रद्द

कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, 6 फेब्रुवारी रोजी होणारा चक्का जाम दिल्लीत होणार नाही. जे समर्थक येथे येऊ शकत नाहीत, त्यांनी उद्या आपापल्या ठिकाणी शांततेत चक्का जाम करावा, असे आवाहनही त्यांनी समर्थकांना केले. farmer Leader Rakesh Tikait canceled the planned Chakka Jam in Delhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, 6 फेब्रुवारी रोजी होणारा चक्का जाम दिल्लीत होणार नाही. जे समर्थक येथे येऊ शकत नाहीत, त्यांनी उद्या आपापल्या ठिकाणी शांततेत चक्का जाम करावा, असे आवाहनही त्यांनी समर्थकांना केले.

नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपीवर कायदा लागू करावा, अशी मागणी करत आंदोलक शेतकरी नेत्यांनी चक्का जामची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीरसिंग राजेवाल म्हणाले की, 6 फेब्रुवारी रोजी देशभरात आंदोलन केले जाईल. यासह आम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत रस्तेही रोखू.अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, विविध जागांवर खंडित झालेली इंटरनेट सेवा याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांनी चक्का जाम पुकारला आहे.

farmer Leader Rakesh Tikait canceled the planned Chakka Jam in Delhi

दरम्यान, सिंघू, गाझीपूरसह दिल्लीच्या अनेक सीमांवर नोव्हेंबरपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. 26 जानेवारी रोजी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या बरीच कमी झाली होती, परंतु भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर या आंदोलनाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर राकेश टिकैत यांनी धडा घेतला असून आंदोलन भरकटू नये म्हणून दिल्लीतील नियोजित चक्का जाम रद्द केल्याचे दिसून येते.

The price of 3 quintals of wheat should be equal to 10 Gram gold, said Rakesh Tikait

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*