प्रसिद्ध कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या, पराभवाने खचल्याने रितीकाच्या कृत्याने खळबळ

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दंगल चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेल्या फोगट कुटंबात आज आत्महत्येची दुर्देवी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केल्याने सारे सुन्न झाले आहेत.Famous wrestlers Geeta and Babita Fogat sister commit suicide, Hrithika’s action sparks defeat

रितिका फक्त १७ वर्षांची होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतपूर येथे गेल्या बुधवारी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचल्यान रितिकाने आत्महत्या केली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे.रितिका राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धा खेळत होती. १४ मार्चला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात फक्त एका गुणाने रितिकाचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने रितिकाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रितिकाने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगट यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. स्पर्धेदरम्यान तेदेखील उपस्थित होते. रितिका महावीर फोगट स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थिनी होती.

रितीका फोगटने आत्महत्या केल्याच्या वृत्तामुळे कुस्ती क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेते आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील याच कुटुंबाचा भाग होती.

Famous wrestlers Geeta and Babita Fogat sister commit suicide, Hrithika’s action sparks defeat

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*