विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या बहाण्याने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा आता पर्दाफाश झाला आहे. तपासातून याचा मोठा खुलासा देखील झाला आहे. कृषी कायद्यांविरोधात भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गन, रिहिना मियां खलीफा यांनी केलेले ट्विट खलिस्तानी संघटनेच्या अपप्रचाराचा एक भाग होता.Famous Hollywood singer Mary Millben’s support for agricultural law; I have full faith in Prime Minister Modi
.हे सिद्ध झाले असतांना आता आणखी एक सेलिब्रिटीने मोदींचे समर्थन केले आहे.
शेतकरी चळवळीला पाठिंबा देण्याच्या नावाखाली चालवल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय अजेंड्याविरूद्ध प्रसिद्ध आफ्रिकन-अमेरिकन सेलिब्रिटी मेरी मिलबेन यांनी पंतप्रधान मोदींचे समर्थन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आज मी माझ्या भारतीय भावांबरोबर उभी आहे. नवीन पंतप्रधान मोदींनी भारतीय शेतकर्यांचे जीवन अधिक चांगले करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकरी कायदा लागू केलेला आहे.असा मला पूर्ण विश्वास आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत शेती महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी हा कोणत्याही देशाचा आधार असतो. शेतात काम करणारे (शेतकरी) आणि देशाचे रक्षण करणार्यांची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे… ही वेळ आली आहे की आपण देशाच्या शांतीदूतांसाठी आवाज उठवला पाहिजे.
Famous Hollywood singer Mary Millben’s support for agricultural law; I have full faith in Prime Minister Modi
2020 दिवाळी निम्मीत्त मेरीने ‘ओम जय जगदीश हरे’ हे गाणे गायले होते . मिल्बेन म्हणाल्या, “ओम जय जगदीश हरे” ने मला नेहमीच प्रभावित केले आहे .
भारत, भारतातील लोक, भारतीय-अमेरिकन समुदाय माझ्यासाठी खूप विशेष आहेत. असेही त्या म्हणाल्या .
मेरीने यापूर्वी 15 ऑगस्ट 2020 रोजी भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनावर राष्ट्रगीत गाऊन भारतावर आपले प्रेम व्यक्त केले होते.