ग्रेटा थनबर्गला निकोल आरबोरचा सल्ला, भारतीयांशी कधीही पंगा घेऊ नकोस…

Famous Comedian Nicole Arbor's advice to Greta Thunberg, Never mess with Indians

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गची आता केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून ट्रोलिंग सुरू झाली आहे. नुकतेच प्रसिद्ध कॉमेडियन निकोल आरबोरनेही भारताच्या समर्थनार्थ ट्वीट करत म्हटले की, ‘भारतीयांसोबत कधीही पंगा घेऊ नये. कॉमेडियन निकोल आरबोरने आपल्या या ट्वीटसोबत हॅशटॅग #GretaThunbergExposed चा वापर केला आहे. Famous Comedian Nicole Arbor’s advice to Greta Thunberg, Never mess with Indians


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गची आता केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून ट्रोलिंग सुरू झाली आहे. नुकतेच प्रसिद्ध कॉमेडियन निकोल आरबोरनेही भारताच्या समर्थनार्थ ट्वीट करत म्हटले की, ‘भारतीयांसोबत कधीही पंगा घेऊ नये. कॉमेडियन निकोल आरबोरने आपल्या या ट्वीटसोबत हॅशटॅग #GretaThunbergExposed चा वापर केला आहे. 18 साल वर्षीय ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाबद्दल एक गुगल डॉक्युमेंट शेअर केली होती. यात कृषी कायद्यांचा जागतिक पातळीवर कशा रीतीने विरोध करायचा, याची संपूर्ण रूपरेषा होती.

ग्रेटा थनबर्गच्या या ट्वीटवरून देशात बहुतांश जणांनी आक्षेप घेतला होता. वाढत असलेला वाद पाहून अखेर ग्रेटाने ते ट्वीट डिलीट केले होते. ग्रेटा थनबर्गच्या या ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राइक- फर्स्ट वेव्ह’ टायटल शेअर करून डॉक्यूमेंटमध्ये 26 जानेवारीला जगभरातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे म्हटले होते. यासोबतच या गुगल डॉक्युमेंटमध्ये सांगण्यात आले होते की, जेथेही तुम्ही राहत असाल तेथून स्थानिक पातळीवरूनच भारतातील शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा द्या, किंवा आपल्या देशात, राज्यात अथवा शहरात सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती घेऊन त्यात सामील व्हा.Famous Comedian Nicole Arbor’s advice to Greta Thunberg, Never mess with Indians

या डॉक्युमेंटमध्ये असेही लिहिले होते की, लोकांनी भारतीय दूतावास, स्थानिक सरकारी कार्यालये किंवा अदानी आणि अंबानी यांच्या कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर एकजूट होऊन विरोध प्रदर्शन करावे. ग्रेटाने ते ट्वीट डिलीट करेपर्यंत त्याचे सर्व स्क्रीनशॉट ट्वीटरवर व्हायरल झाले होते. यानंतर सोशल मीडियावर ग्रेटा थनबर्गची जोरदार ट्रोलिंग सुरू आहे.

Famous Comedian Nicole Arbor's advice to Greta Thunberg, Never mess with Indians

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था