फडणवीसांच्या सौर कृषीपंप योजनेची ठाकरे – पवार सरकारने लावली वाट


विशेष प्रतिनिधी

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना २४ तास विजेची सुविधा देऊन शेतकऱ्यांना हवे तेव्हा पिकांना पाणी देता यावे, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना आणली होती. मात्र या योजनेसाठी शेतकऱ्यांनी १६ हजार ५६० रूपये भरूनही ठाकरे – पवार सरकारमधील भोंगळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार सौर कृषीपंपाचा लाभ शेतकऱ्यांना देत नसल्याने ते मेटाकुटीस आले आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊच्या काळात सरासरीच्या नावाखाली महावितरण कंपनीने वीजबिलांमध्ये जादा वसुली करण्याचा धडाका लावला आहे. यामुळे नागरिक तसेच शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी केवळ रात्रीच पूर्ण क्षमतेने वीज उपलब्ध होते. त्यामुळे रात्रीच पिकांना पाणी द्यावे लागते.

फडणवीस यांनी शेतकरी हित बघून माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृरदृष्टीकोन ठेवून सौर कृषी पंप योजना सुरू केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले. महावितरणने अर्ज भरून शेतकऱ्यांकडून पैसेही वसूल केले.

पण त्यानंतर आता ठाकरे – पवार सरकारने या योजनेवरच घाला घातला असून कुठल्याही प्रकारचे नियोजन त्यासाठी नाही. शेतकऱ्यांना सौर कृषीपंप मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे भरूनही सरकारच्या कामकाजाबाबत मनस्ताप सहन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. बळीराजासाठी असणारी एक चांगली चालणारी योजना ठाकरे – पवार सरकारने बंद पाडली आहे, हे दुर्देवच म्हणावे लागेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था