5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार का?, आरबीआयने दिले हे उत्तर

Fact Check Will Rs 5, 10 and 100 notes really be discontinued?, RBI replied

देशातील अनेक माध्यमांमध्ये वृत्त आले की, लवकरच 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. मार्च-एप्रिलनंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनात नसणार असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेच्या हवाल्याने करण्यात आला. परंतु पीआयबी फॅक्टचेकने हा अहवाल खोटा असल्याचे ठरवले असून हे दावे बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. Fact Check Will Rs 5, 10 and 100 notes really be discontinued?, RBI replied 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील अनेक माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर लवकरच 5,10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होण्याविषयी वृत्त छापून आले आहे. मार्च-एप्रिलनंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनात नसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशा बातम्यांचे स्क्रीनशॉट्स आणि लिंकही सोशल मीडियावरही शेअर करण्यात येत आहेत.

तथापि, पीआयबीएफएक्टचेकने असे हे वृत्त फेटाळले असून नोटा चलनातून बाद होयाच्या दाव्यांना खोटे ठरवले आहे. पीआयबी फॅक्टचेकने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती देत ​​ट्विट केले आहे. ट्विटमध्ये, “एका बातमीत दावा केला जात आहे की, आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनात नसतील. पीआयबी फॅक्टचेकमध्ये हा दावा बनावट असल्याचे सिद्ध झाले असून आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही”तत्पूर्वी, 5 रुपये, 10 रुपये आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होण्याच्या या बातम्यांमध्ये अनेक दावे करण्यात आले होते. यात असे म्हटले गेले होते की, आरबीआय या नोटा बंद करण्याआधी लोकांना त्या बँकेत जमा करण्याची संधी देईल. जुन्या नोटा खात्यात जमा करून त्या सहज बदलता येतील.

Fact Check Will Rs 5, 10 and 100 notes really be discontinued?, RBI replied

यात असेही म्हटले होते की, नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या गोंधळामुळे आरबीआय कोणतीही जुनी नोट अचानक बंद करणार नाही. त्यासाठी केवळ त्या मूल्याची नवीन नोट बाजारात आणूनच जुनी नोट चलनाबाहेर करण्यात येणार आहे. जुन्या नोटांच्या जागी यापूर्वी बर्‍याच नवीन नोटा चलनात आल्या आहेत. तथापि, पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हे सर्व दावे खोटे असल्याचे आढळले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती