फेसबुक वॉच पार्टी सुविधा १६ एप्रिलपासून बंद! तातडीने डेटा डाऊनलोड करा नाहीतर…

विश्वनाथ गरुड

पुणे : अनेक फेसबुक युजर्स ज्या सुविधेचा मोठा वापर करीत होते ती फेसबुक वॉच पार्टी सुविधा लवकरच बंद करण्यात येणार आहे. फेसबुककडूनच मेलच्या माध्यमातून काही युजर्सना ही माहिती देण्यात आली. Facebook Watch Party feature to be closed from 16 April

येत्या १६ एप्रिलपासून फेसबुक वॉच पार्टी सुविधा प्रोफाईल, पेजेस, ग्रुप्स या सर्वांसाठी बंद करण्यात येईल, असे संदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी या पूर्वी फेसबुक वॉच पार्टी सुविधेचा वापर केला होता. त्यांच्या त्या पोस्ट, त्यावरील कमेंट्स आणि रिॲक्शन्स हे सर्व काढून टाकण्यात येईल.ज्या युजर्सना त्यांच्या जुन्या वॉच पार्टी पोस्ट संदर्भासाठी हव्या असतील. त्यांनी त्या पोस्ट डाऊनलोड करून ठेवाव्यात. या पोस्ट डाऊनलोड कशा करायच्या हे सुद्धा फेसबुककडून सांगण्यात आले आहे. १५ एप्रिलपूर्वी आपला फेसबुक डेटा डाऊनलोड केला तरच वॉच पार्टीच्या पोस्ट उपलब्ध होतील. १६ एप्रिलपासून जुन्या वॉच पार्टी पोस्ट दिसणार नाहीत.

वॉच पार्टीशिवाय इतर सर्व प्रकारच्या सुविधा सध्या प्रमाणेच सुरू राहतील, असेही या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे

Facebook Watch Party feature to be closed from 16 April

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*