न्यूज इंडस्ट्रीत फेसबुक करणार एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, ऑस्ट्रेलियाशी झालेल्या संघर्षानंतर निर्णय

Facebook to invest one billion in news industry, decision after conflict with Australia

फेसबुकने बुधवारी आश्वासन दिले की, येत्या तीन वर्षांत ते न्यूज इंडस्ट्रीत एक अब्ज डॉलर्स (सात हजार कोटी रुपये) गुंतवणार आहेत. न्यूजच्या पेमेंटबाबत ऑस्ट्रेलियाशी झालेल्या वादानंतर अमेरिका स्थित दिग्गज इंटरनेट मीडियाने ही घोषणा केली आहे. Facebook to invest one billion in news industry, decision after conflict with Australia


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : फेसबुकने बुधवारी आश्वासन दिले की, येत्या तीन वर्षांत ते न्यूज इंडस्ट्रीत एक अब्ज डॉलर्स (सात हजार कोटी रुपये) गुंतवणार आहेत. न्यूजच्या पेमेंटबाबत ऑस्ट्रेलियाशी झालेल्या वादानंतर अमेरिका स्थित दिग्गज इंटरनेट मीडियाने ही घोषणा केली आहे.

फेसबुकने बुधवारी सांगितले की, 2018 पासून न्यूज इंडस्ट्रीमध्ये त्यांनी 600 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पेमेंटबद्दल फ्रान्स आणि जर्मनीमधील न्यूज पब्लिशर्सशी चर्चा सुरू आहे. याव्यतिरिक्त त्यांनी असेही म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये सर्व प्रकारच्या बातम्यांवर बंदी घालताना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील काही कंटेंटही अनवधानाने बंद केले होते. तथापि, काही काळानंतर ही चूक दुरुस्त करण्यात आली.गुरुवारी फेसबुकने त्यांच्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलियाच्या बातम्या पाहण्यास आणि शेअर करण्यास बंदी घातली होती. बातम्यांचा वापर करायचा असल्यास ऑस्ट्रेलियन मीडियाला पैसे देण्याची तरतूद ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रस्तावित कायद्यात आहे. याविरोधात त्यांनी हे पाऊल उचलले. विशेषत: फेसबुक आणि गुगलला लक्षात ठेवून हा कठोर कायदा करण्यात येत आहे. मात्र, सरकारने आता ते बदलण्यास सहमती दर्शविली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारबरोबर झालेल्या करारानंतर फेसबुकने मंगळवारपासून या देशातील आपल्या सेवा पूर्ववत केल्या आहेत.

Facebook to invest one billion in news industry, decision after conflict with Australia

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी