सरकार उलथून टाकल्यानंतर म्यानमारमध्ये फेसबुक ब्लॉक ! नागरी असहकार आंदोलनाला गती

विशेष प्रतिनिधी

यांगून : म्यानमारमध्ये जनमताचा कौल मिळालेले सरकार उलथून टाकल्यानंतर लष्कराने आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरु केली आहे. आता फेसबुक ब्लॉक करण्यात आले. उठावानंतर देशात स्थैर्य नांदावे असे कारण लष्कराकडून देण्यात आले.Facebook blocked in Myanmar after overthrowing government! Accelerate the civil non-cooperation movement

म्यानमारमधील अनेकांसाठी या सोशल मिडीयाच्या रूपाने इंटरनेटचा एकमेव अॅक्सेस आहे. विरोधकांनी त्या माध्यमातून एकत्र येण्यास प्रारंभ केला होता.
दरम्यान, नागरी असहकार वाढत आहे. संसदेच्या सदस्यांनी राजधानीतील त्यांचे ठिकाण सोडण्यास नकार दिला आहे. यांगूनमध्ये अनेक जण थाळ्या वाजवून निषेध करीत आहेत.

उठावानंतर लष्करप्रमुख मीन आँग हिलैंग यांनी स्थापन केलेल्या ११ सदस्यीय कायदेमंडळाने प्रमुख नेत्या आँग सान स्यू की आणि अध्यक्ष वीन म्यींत यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.

Facebook blocked in Myanmar after overthrowing government! Accelerate the civil non-cooperation movement

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*