लोकलच्या पासला अखेर मुदतवाढ; रेल्वेच्या घोषणेमुळे प्रवाशांना दिलासा


व्रुत्तसंस्था

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात लोकलच्या अनेक प्रवाशांच्या पासची मुदत संपली. त्या पासना मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला आहे.त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. Extension of local train pass of mumbai

मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. पण, टाळेबंदीमुळे प्रवाशांच्या पासची मुदत संपली होती. त्यांना सोमवारपासून शिल्लक राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.
२४ मार्च २०२० पासून कोरोना संसर्गामुळे लोकल सेवा बंद केली होती.त्यापूर्वी प्रवाशांनी एक महिना, तीन महिने, सहा महिने व वर्षभराचे पास काढले होते. अशा प्रवाशांच्या पासची मुदत टाळेबंदीत संपली. अनेकांनी प्रथम, द्वितीय श्रेणी आणि अगदी वातानुकूलित लोकलचेही पास काढले होते.

सेवा बंद असल्याने या पासना मुदतवाढ मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाली. तेव्हा त्यांच्या पासला मुदतवाढ दिली होती. त्याच धर्तीवर अन्य प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Extension of local train pass of mumbai

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती