शरद पवारांना अध्यक्ष करण्याच्या मोहीमेमुळे संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्न

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अस्तित्वात राहील का, हा प्रश्न सध्या राजकीय वतुर्ळात चर्चिला जात आहे. Existence of the UPA is in question due to the campaign to make Sharad Pawar president


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अस्तित्वात राहील का, हा प्रश्न सध्या राजकीय वतुर्ळात चर्चिला जात आहे.

संयुक्त पुरोगामी लोकशाडी आघाडीत आलबेल नाही. त्यातच सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या कारणावरून शरद पवार यांना संपुआचे अध्यक्ष करण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्याने केली जात आहे. वास्तविक शरद पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. शिवसेना संपुआत नसल्यामुळे त्यांच्या मागणीकडे गंभीरपणे पाहिले जाऊ शकत नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, ही खरोखर गंभीर चर्चा आहे. संपुआच्या जागी नवीन आघाडी स्थापन करण्याबाबत काही राजकीय पक्षांत संवाद सुरू झालेला आहे.राष्टीय जनता दलाच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, शरद पवार हे मागील काही दिवसांपासून विभिन्न राजकीय पक्षांशी सातत्याने बोलत आहेत. पाच राज्यांतील निकाल काँग्रेसच्या विरोधात गेल्यास बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस आघाडीची स्थापना केली जाऊ शकते.

शरद पवार हे याबाबतीत ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, चंद्रशेखर राव, स्टॅलिन इत्यादी प्रादेशिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. निवडणूक निकालानंतर लगेच नव्या आघाडीबाबत चर्चा होऊ शकते.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वास काँग्रेसमधून विरोध असतानाच भाजपेतर पक्षही त्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याची स्पष्ट मागणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अलीकडेच केली आहे. मात्र, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसला दुसºया पक्षाचा अध्यक्ष आघाडीच्या अध्यक्षपदी चालणार नाही. त्यातच शरद पवार यांच्यावर कॉँग्रेस नेतृत्वाचा विश्वस नसल्याचे अनेक प्रकरणावरून दिसून आले आहे.

संजय राऊत यांनी ही मोहीम सुरू केली असली तरी शरद पवार हे या सगळ्या घडामोडींचा भाग आहेत, असे जाणकारांना वाटते. कारण त्यांनी अलीकडेच आसामात पुन्हा भाजपा सरकार येईल, असे वक्तव्य केले होते. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजद ममता बॅनर्जी यांचा प्रचार करीत आहेत.

Existence of the UPA is in question due to the campaign to make Sharad Pawar president

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*