मंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यावर घाणीत राहण्याची वेळ, अवघ्या काही हजारांच्या कामासाठी नागपूर मनपाने सांगितले निधी नसल्याचे कारण

Ex Minister Yashwant Nikose Struggle For drainage line issue with Nagpur Municipal Corporation

लालफीतशाही काय असते हे सर्वसामान्यांना चांगलेच माहिती आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हणच मराठीत रुढ झालीये, ती बाबू लोकांच्या अनास्थेमुळे! पण त्याच जागी एखादा मातब्बर मंत्रिपद भोगलेला नेता असेल तर त्यांची मात्र कामे चुटकीसरशी होतात, अशी सर्वसाधारण धारणा आहे. परंतु थांबा! सरकारी लालफीतशाहीचा फटका नेतेमंडळींनाही बसतो, याचे जिवंत उदाहरण आहेत नागपुरातील बसपचे नेते यशवंत निकोसे. आपले छोटेसे काम व्हावे यासाठी नागपूर महापालिकेने त्यांना अक्षरश: जेरीस आणलं आहे. अवघ्या तीस फुटांची सीव्हर लाइनमुळे ते त्रस्त आहेत. Ex Minister Yashwant Nikose Struggle For drainage line issue with Nagpur Municipal Corporation


विशेष प्रतिनिधी

नागपूर : लालफीतशाही काय असते हे सर्वसामान्यांना चांगलेच माहिती आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हणच मराठीत रुढ झालीये, ती बाबू लोकांच्या अनास्थेमुळे! पण त्याच जागी एखादा मातब्बर मंत्रिपद भोगलेला नेता असेल तर त्यांची मात्र कामे चुटकीसरशी होतात, अशी सर्वसाधारण धारणा आहे. परंतु थांबा! सरकारी लालफीतशाहीचा फटका नेतेमंडळींनाही बसतो, याचे जिवंत उदाहरण आहेत नागपुरातील बसपचे नेते यशवंत निकोसे. आपले छोटेसे काम व्हावे यासाठी नागपूर महापालिकेने त्यांना अक्षरश: जेरीस आणलं आहे. अवघ्या तीस फुटांची सीव्हर लाइनमुळे ते त्रस्त आहेत.

कोण आहेत यशवंत निकोसे?

बहुजन समाज पक्षाचे मातब्बर नेते म्हणून यशवंत निकोसे यांना ओळखले जाते. निकोसे हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थीही आहेत. तारुण्यात त्यांच्यावर दिवंगत कांशीराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. याचमुळे त्यांनी घरादाराचा, नोकरीचा त्याग करून बसपचे काम हाती घेतले.निष्ठावान कार्यकर्ते म्हणून निकोसे यांची ओळख आहे. त्यांची ही निष्ठा पाहूनच बहनजी मायावती यांनी त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनवले. एवढेच नाही तर स्वत:च्या मंत्रिमंडळात त्यांना सांस्कृतिक मंत्रीही बनवले होते. 2007 ते 2012 या आपल्या कार्यकाळात निकोसे यांनी यूपीमध्ये मंत्रिपदी राहून अनेक महत्त्वाचे उपक्रम पार पाडले. 2017 मध्ये निकोसे नागपुरात परतले. परतल्यानंतरही त्यांनी 35 वर्षांपूर्वी जे घर सोडले होते त्याच घरात राहायला सुरुवात केली. नागपूरच्या गड्डीगोदाम परिसरात एका झोपडपट्टीत त्यांचे मोडकळीस आलेले घर आहे. निकोसे यांच्या भावाचे चॉकलेट-बिस्किटांचे छोटेसे दुकान आहे. या दुकानामागेच एका पत्र्याच्या खोलीत ते राहतात.

काय आहे प्रकरण?

मागच्या काही महिन्यांपूर्वी निकोसे राहत असलेल्या गल्लीत नागपूर मनपाने काँक्रीटचा रस्ता बनवला. या कामात निकोसे यांच्या घराची सीव्हर लाइन फुटली. परिणामी, सीव्हरचे घाण पाणी निकोसे यांच्या घरात तसेच स्वच्छतागृहात तुंबू लागले. प्रचंड दुर्गंधीमुळे या घरात राहणे अत्यंत कठीण होऊन बसले.

आपल्या त्रासासाठी कधीकाळी मंत्रिपदी राहिलेल्या निकोसे यांनी स्थानिक नगरसेवक ते महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतु काहीही कारवाई झाली नाही. मनपा आयुक्तांना तसेच महापौरांनाही त्यांनी लेखी अर्ज दिले. परंतु आश्वासन तेवढे मिळाले. कहर म्हणजे अवघ्या तीस फुटांच्या सीव्हर लाइनच्या दुरुस्तीसाठी मनपा निधी नसल्याचे कारण दिले आहे. यामुळे निकोसे यांचे आणि गल्लीतील नागरिकांचे घाण पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिस्थितीत राहण्यास त्यांचा नाइलाज झाला आहे.

यासंदर्भात ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दखल घेऊन महापौरांना विचारले असता, महापौरांनी यशवंत निकोसे यांची तक्रार मिळाली असून त्यांच्या घराबाजूची सीव्हर लाइन दुरुस्त करण्यास अभियंत्यांना सांगितल्याचे म्हटले आहे.

Ex Minister Yashwant Nikose Struggle For drainage line issue with Nagpur Municipal Corporation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती